Posts

Cap no 278, Never sign off अजिंक्य

श्री  Cap no 278, Never sign off अजिंक्य  Jinx म्हणजे अजिंक्य रहाणे ला मी दोनदा भेटलोय,  प्रसंग 1 पहिल्यांदा मी माझे ऑडिट संपवून बडोदा एअरपोर्ट वर परतीच्या वाटेवर होतो, तेव्हा नुकतीच देवधर ट्रॉफी मारून ( आम्हा क्रिकेटरच्या भाषेत ट्रॉफी मारणे म्हणजे जिंकणे) आपला पश्चिम विभागाचा संघ वसीम जाफर, प्रवीण आमरे ( coach) आणि इतर मला भेटले, मी वसीम जाफर व प्रवीण आमरे दोघांचे टीम सकट फोटो घेतले. तेव्हा वसीम जाफर मला म्हणाले, आज ह्याचा स्पेशल फोटो घ्या, नवीन मुलगा आहे, अजिंक्य रहाणे, आज ह्याने सेंच्युरी लावल्ये आणि आपण देवधर मारली,( century लावली हाही आम्हा शिवाजीपार्क खेळलेल्या मुंबईच्या भाषेत century मारली.) मग मी अजिंक्यचे अभिनंदन करून फोटो घेतला. प्रसंग 2 अजिंक्य डोंबिवलीचा स वा जोशीचा असल्याने GEI च्या वार्षिक संमेलनात एका वर्षी जोशी High school मध्ये जिथे माझ्या वडिलांच्या नावे man of the match व आजीच्या नावे man of the series अशा दोन ट्रॉफी क्रिकेट टुर्नामेंट मध्ये दिल्या जातात, तिथे बक्षीस समारंभामध्ये क्रिकेट trophies आम्हा दोघांच्या हस्ते द्यायचा योग आला होता.  थोड्या...

तगडा रह यारा

Image
श्री  247Orbit Health Compliance Camp Business Post माझ्या सर्व ब्लॉग मध्ये मी जे काही अनुभवतो ते सांगायचा प्रयत्न करतो. मग तो movie, webseries content, पुस्तक, एखादे स्थळ, आप्त स्वकीयांसोबत एखादा भेटप्रसंग, एखादा माणूस, किंवा एखादे गाव, शहर किंवा काहीही जे काही मनाला आनंद देत, किंवा शिकवून जात , ते मी माझ्या ब्लॉगमध्ये मांडत असतो. त्या सगळ्यातून जे आवडेल ते आचरण करणे तसेच ते अनुभव पुढे सांगत जाणे ह्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. फिटनेस हा सुद्धा असाच अवलोकन करून मी आधी स्वतः आचरणात आणला, आणि त्याचे योग्य ते फायदे लक्षात आल्यावर आणि अनुभवल्यावर आजचा ब्लॉग मी फक्त फिटनेस ह्यावरच लिहिणार आहे. कामानिमित्त भारतभर अथवा परदेशात असताना फिटनेस ह्या विषया बद्दल , मी अनेक व्यक्ती, प्रकिया, समूह अथवा शिबिरे पाहिली, पण अनुभवाने असे लक्षात आले की ह्यात आरंभशूर खूप असतात. म्हणजे जॉगिंग अथवा वॉक साठी, ट्रॅकसूट, महागडे बूट, योगविद्येसाठी मॅट वगैरे सगळे करण्यापर्यंत अत्यंत हौस असते. आणि इथपर्यंत सगळं ठीक असतं. पण जेव्हा त्यातून प्रत्यक्ष अंगमेहनत करताना घाम निघतो , त्या प्रक्रियेसाठी जेव्हा एखादी वेळ...

Airport चे अंतर्गत विश्व

Image
श्री  Airport चे अंतर्गत विश्व आजचा ब्लॉग खास एअरपोर्ट साठी.. Frequent fliers ना लक्षात येईल मी का आणि काय म्हणणार आहे ह्यात ते.. किमानपक्षी संदर्भ नक्कीच लागेल तसा airport झोपत नाहीच.. आपली टॅक्सी departure जवळ आली की आपण ह्या विश्वात प्रवेश करतो.  उतरल्यावर , trolley मग त्यावर ब्यागा लोड करणे हा कार्यक्रम झाला की आपण एन्ट्री checkpoint कडे जातो, बाहेरील निरोपाच्या भेटी, पहिलटकरांच्या अथवा शिकायला , नोकरीनिमित्त दीर्घकाळ जाणाऱ्यांचे नमस्कार चमत्कार आणि भावनिक प्रसंग , डोळ्यात साठवत आणि मनात कोरून आपण पुढे जातो. पूर्वी नुसता ही documental security activity आधी बोर्डिंग पास बघून , बोर्डिंग पास सोबत आधार कार्ड बघत बघत होणारा तो प्रवास आता digilocker पर्यंत आला आहे.  Digilocker वापरायला लागा, खूप सोयीचे आहे.. तर मग आपण पुढे येतो .. मी नेहमी त्या एन्ट्री लेवल CRPF staff किंवा जो कोणी असेल त्याला जय हिंद म्हणूनच पुढे सरकतो. मग आपण जातो ते आपल्या airlines काउंटरवर , आपले सामान सुपूर्द करतो आणि सामानाचा टॅग घेऊन पुढे सरकतो (इथे वजनी गट जास्ती असल्यास चलनी गटावर येणारा ताण लक्...

राजकारण आणि stakeholders

Image
श्री  राजकारण आणि stakeholders  आजचा ब्लॉगचा विषय वेगळा आहे..वाचा आणि विचार करा.. राजकीय पक्ष असो ,कॉर्पोरेट कंपनी असो किंवा विश्वस्त संस्था (मग ती धर्मादाय असो किंवा बहुउद्देशीय ), जिथे चार व्यक्ती एकत्र आल्या तिथे राजकारण आलं आणि stake holders पण तयार झाले. हे stake holders ज्यात, प्रामुख्याने संस्थेवर पैसे लावतात आणि संस्था कायम ताब्यात ठेवतात असे भांडवलदार.. दुसरा प्रकार म्हणजे ज्यांचा जनसंपर्क , ज्याला आजकाल connects म्हणतात, तो खूप असतो..असे, त्यांनाही संस्थेत अनन्यसाधारण महत्व असतं..उपयोग असे पर्यंत.. उरलेले सगळे मजूर असतात. जे perform करतात त्यांना त्यांच्या ego व मोबदल्यासकट अशा कुशलतेने हाताळायचे असते की त्यांना वाटत राहत की संस्था त्यांच्यामुळेच चालते. वास्तविक संस्था फक्त stake holders मुळेच चालत असते.. Performers बाहेर मोबदला दिला की हवे तेवढे उपलब्ध असतात. शेवटचा गट असतो, तो incompetent म्हणजे कसलेही कौशल्य आणि आयुष्यात कसलेही मार्ग उपलब्ध नसलेल्या कळपाचा.. अशा , आणि म्हणूनच नाईलाजाने संस्थेवर निष्ठा असलेल्या सजीव अनुयायांचा.. त्यांना सतत असे जाणवू...

इन्स्पेक्टर अविनाश Season 2

Image
श्री  उत्तर प्रदेश आणि बिहार प्रदेशाबद्दल , मला पुराण या विषयातील जाणकारांना आणि इतिहासकारांना नक्कीच भेटायला आवडेल. असं काय आहे त्या भूमी मध्ये की जिथे एका वेगळ्याच स्तरातील गुंडगिरी अस्तित्वात होती ? इन्स्पेक्टर अविनाश,  ह्या जिओस्टर वरील वेब सिरीज बद्दल म्हणजे त्याच्या पहिल्या सीजन बद्दल मी रिव्ह्यू लिहिलाच होता. इन्स्पेक्टर अविनाश मिश्रा ह्या उत्तर प्रदेश मधील दबंग पोलीस अधिकाऱ्यावर , त्याच्या कादंबरीवर, ही वेब सिरीज बेतली आहे. आपण विचारच करू शकणार नाही , अशा थरातली गुंडगिरी , त्याच्या मागचं राजकारण , समाज आणि अर्थकारण याचा पूर्णपणे बिमोड करत एकेका नराधमाला संपवत सिस्टीम मध्ये राहून आपल्याच पद्धतीने काम करणारा पण 100% रिझल्ट देणारा असा हा इन्स्पेक्टर अविनाश मिश्रा ! हे करत असताना त्याच्या कौटुंबिक आयुष्यात निर्माण झालेली वादळे तो स्वतः महाकालचा निस्सिम भक्त कसे हाताळतो..प्रसंगी गुंडांसाठी स्वतः कसा महाकाल होतो..हेही बघण्यासारखे.. अर्थात , मी बाकी काहीही सांगणार नाहीये माझ्या नेहमीच्या पद्धतीने नुसार आणि घरचा अभ्यास म्हणून तुम्हालाही वेब सिरीज बघायला सांगणार आहे आधीचा गृहपा...

जिंदगी ना मिलेगी दोबारा

Image
श्री  आजची पोस्ट , जिंदगी ना मिलेगी दोबारा , यामध्ये असलेल्या लहानपणापासूनच्या तीन मित्रांची !  सुरुवातीपासून सांगतो , काय झालं की , 15 16 17 मे , म्हणजे ,  परवापासून उद्यापर्यंत मी व माझी सौ ,माझ्या एका घनिष्ठ वर्गमित्र आणि त्याच्या सौ बरोबर त्याच्या पुण्यातील घरात, व नंतर दुसऱ्या दिवशी पुण्यातील आमच्या अजून एका घनिष्ठ मित्राच्या घरी राहायला जायचे ठरले.   पहिल्या दिवशी भुगावच्या मित्राच्या घराजवळचा तलावाच्या काठी सूर्यास्त , रात्री गप्पा, बाहेर घरगुती जेवण ,ice cream व गप्पा अशा भरगच्च कार्यक्रमानंतर , दुसऱ्या दिवशी पुण्यातील मित्राच्या घरी गेलो, त्याच्या इलेक्ट्रिक SUV मधून आम्ही पावना डॅमचा अप्रतिम निसर्ग अनुभवला , रात्री भरपूर गप्पा झाल्या, त्याच्या सौ नी केलेल्या गरम गरम खिचडी , गाणी , ice cream अशा कार्यक्रमानंतर ( ज्यात आम्हाला आमचा पुण्यातील अजून एक शालेय मित्रसुद्धा जॉइन झाला), तिसऱ्या दिवशी डोंबिवली घरी परत..  खर तर नाईट आउट हा कन्सेप्ट या नवीन पिढीने आम्हाला दाखवून दिला आणि तो आम्हाला करायलाही भाग पाडला आम्ही डोंबिवलीतही आमच्याकडे असे मित्र मंडळ नाईट ...

धुरंधर 1&2 The Music

Image
श्री  धुरंधर 1&2 The Music एका सिनेमाचा तिसरा रिव्यू लिहिण्याची पहिलीच आणि कदाचित शेवटची वेळ असेल.  मी, धुरंदर 1 आणि 2 हा एकच सिनेमा समजतो आणि आता जरा या दोन्ही सिनेमांच्या music बद्दल ! बघा, या सिनेमात जर का म्युझिकच नसतं किंवा जे म्युझिक दिलय , त्या प्रकारचं नसतं , तर कसा वाटला असता सिनेमा ?मला तर कल्पनाच करवत नाही, जुन्या नवीन गाण्याचा उत्तम संगम , गझल असो किशोर कुमारची गाणी पेरलेली असोत किंवा जुन्या गाण्यांचा रिमिक्स करून त्याच्यात आवश्यकता beats घालून जे काही सुंदर फ्युजन त्यांनी केलंय ते निव्वळ अप्रतिम ! नुसती गाणी नसून प्रसंगाला पण साजेशी अशी , त्या त्या प्रसंगा बरोबर गाणी पेरली आहेत , त्यामुळे ती गाणी आपण फास्ट फॉरवर्ड केली तर पिक्चरचा बराचसा कंटेंट Miss होईल. अर्थात फास्ट फॉरवर्ड करवतच नाही तो सिनेमा.. शाश्वत सचदेवचे music ह्या अशाश्वत जगात अगदी शेवटपर्यंत म्हणजे शाश्वत राहील.. वानगीदाखल एकच उदाहरण देतो ते म्हणजे रमणा बालचंद्रन ह्यांचे फिर से गाण्यामधील वीणावादन..काय Impact आहे जबरदस्त.. मला नाही वाटत कुठल्याही सिनेमाचे एवढे reels किँवा प्रत्येक ...