Cap no 278, Never sign off अजिंक्य
श्री
Cap no 278, Never sign off अजिंक्य
Jinx म्हणजे अजिंक्य रहाणे ला मी दोनदा भेटलोय,
प्रसंग 1
पहिल्यांदा मी माझे ऑडिट संपवून बडोदा एअरपोर्ट वर परतीच्या वाटेवर होतो, तेव्हा नुकतीच देवधर ट्रॉफी मारून ( आम्हा क्रिकेटरच्या भाषेत ट्रॉफी मारणे म्हणजे जिंकणे) आपला पश्चिम विभागाचा संघ वसीम जाफर, प्रवीण आमरे ( coach) आणि इतर मला भेटले, मी वसीम जाफर व प्रवीण आमरे दोघांचे टीम सकट फोटो घेतले.
तेव्हा वसीम जाफर मला म्हणाले, आज ह्याचा स्पेशल फोटो घ्या, नवीन मुलगा आहे, अजिंक्य रहाणे, आज ह्याने सेंच्युरी लावल्ये आणि आपण देवधर मारली,( century लावली हाही आम्हा शिवाजीपार्क खेळलेल्या मुंबईच्या भाषेत century मारली.)
मग मी अजिंक्यचे अभिनंदन करून फोटो घेतला.
प्रसंग 2
अजिंक्य डोंबिवलीचा स वा जोशीचा असल्याने GEI च्या वार्षिक संमेलनात एका वर्षी जोशी High school मध्ये जिथे माझ्या वडिलांच्या नावे man of the match व आजीच्या नावे man of the series अशा दोन ट्रॉफी क्रिकेट टुर्नामेंट मध्ये दिल्या जातात, तिथे बक्षीस समारंभामध्ये क्रिकेट trophies आम्हा दोघांच्या हस्ते द्यायचा योग आला होता.
थोड्या वेळ गप्पा मारण्याचाही योग आला होता.
प्रसंग 3
नेत्रदिपक अशी ऑस्ट्रेलिया series 2021, जी आपण 2-1 जिंकलो, ती केवळ अजिंक्य रहाणे एक player म्हणून ani as a captain म्हणून.
तेव्हा मी मनाने ब्रिस्बेन मध्ये pitch वरच होतो.
मध्यंतरी अजिंक्य च्या संघाबाहेर असण्याबद्दल माझा लाडका हर्ष भोगले त्याच्या एबीपी माझा मध्ये अगदी अलीकडे,म्हणाला होता की त्याला box office नाहीये म्हणून तो संघाबाहेर आहे.
आणि कालच अजिंक्यने 22 यार्डच्या जगातून आपला निरोप घेतला.
आज ही पोस्ट शेअर करताना मी हर्षाच्या दुसऱ्या व्हिडिओची जी अजिंक्याबाबत आहे, त्याची लिंक पण सोबत जोडतोय, please बघा..
https://youtu.be/Nd45jpj9BZQ?si=vhKtOq5Ba1zX6h61
अजिंक्यच्या अकाली exit ने चुटपुट तर राहीलच..
पण तो खरोखर अजिंक्य आहे, बघा ना
Test Captaincy
6 matches, 4 won, 2 draw
अजिंक्यच आहे तो आणि राहीलच..
Meanwhile, I know this is strategic time out Ajinkya, you will come back.
जय हिंद
🌹🙏🇮🇳 🏏
संजय सुभाष वेलणकर
असे reviews व सर्व लेख माझ्या Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com
Comments
Post a Comment