क्रांतिज्योती विद्यालय
श्री
क्रांतिज्योती विद्यालय
कोणतेही लहान मूल , कळायला लागल्यापासून , घरातील सर्वांचे अनुकरण करत असते, बोलायला लागल्यापासून , जे ऐकतात, ते जसे जमेल तसे , बोलायचा प्रयत्न करतात.
दुसऱ्या भाषेत , घरात जी भाषा बोलली जाते ,
त्या ' मातृभाषेतच ' लहान मुले बोलायला लागतात.
कारण जन्मत: ती मातृभाषाच त्यांना समजायला लागते आणि हळूहळू सगळे ज्ञान त्यांना अगदी सज्ञान होईपर्यंत त्यांना मातृभाषेतून अधिक काय, सर्वात जास्ती समजते.
म्हणूनच शालेय शिक्षण हे त्या त्या मातृभाषेतून आणि मातृभाषेतूनच घेतले पाहिजे , पुढे काहीही जड जात नाही.
स्वतःवरून सांगतो, इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा व डिग्री इंजिनीअरिंग करून आज बऱ्याच देशात कामानिमित्त गेलो आहे, जात असतो, कॉर्पोरेट जगतात बऱ्याच foreigners सोबत कामानिमित्त संवाद, सुसंवाद आणि माहितीची देवाण घेवाण सुद्धा उत्तम इंग्रजी मध्ये ( जी आज जागतिक व्यावसायिक भाषा आहे, आणि हे सत्य नाकारता येणारच नाही) करतो.
( आता Chinese भाषा पण शिकवतो मी ).
असो,
आता इथून पुढे मात्र मातृभाषेचे महत्व, श्री. सचिन खेडेकर ह्या चित्रपटाद्वारे आपल्याला सांगतील.
क्रांतिज्योती विद्यालयाचे, एकेक दृश्य पाहताना मी माझ्या टिळकनगर विद्यामंदिर , डोंबिवली, ह्या शाळेशी जोडला जात होतो, कनेक्ट होत होतो.
हेमंत ढोमे, हा झिम्मा नंतर एक अत्यंत लक्षात राहणारा , तरुण, गुणी व अत्यंत प्रॅक्टिकल दिग्दर्शक आहे असे माझे खास मत झाले आहे.
बाकी casting म्हणजे अत्यंत उत्तम, सोबतच्या चित्रात तुम्ही पहा , कोण कोण आहे ते आणि हा हाऊसफुल चित्रपट मात्र चित्रपटगृहात जाऊनच पहा.
मी नेहमीसारखे बाकी काहीही सांगणार नाही.
पहिल्या फ्रेमपासून डोळ्याच्या कडा पाणावणारा, पण शेवट पर्यंत हसवत ठेवणारा , मनाला हळवा करून जाणारा, असा हा उत्कृष्ठ चित्रपट आहे.
पुन्हा आपली मराठी शाळा अनुभवा, क्रांतिज्योती विद्यालय मध्ये..
सोबत अत्यंत नयनरम्य असे आपले कोकण सुद्धा अनुभवा..
रम्य हे स्वर्गाहून कोकण..
असे reviews व सर्व लेख माझ्या Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com
Comments
Post a Comment