धुरंधर 2 The Revenge

श्री

धुरंधर 2 , The Revenge

मित्रहो , माझा हा रिव्ह्यू थोडासा तिखट असणारे बर का !
हे स्पेशली ,त्या लब्ध प्रतिष्ठित लोकांसाठी ,जे  आपापल्या कम्फर्ट झोन मध्ये राहणारे,  फार violent आहे नाही मूवी ?, मला उडते तीर घ्यायचे नाहीत ,  आपण बरं आणि आपलं बर , अशा संकुचित विचारसरणीचे,  आम्ही टॅक्स भरतो , अजून काय करायचं देशासाठी, बजेटमध्ये आम्हाला काय मिळणार, मतदानाच्या दिवशी सुट्टी घेणारे, आपण काहीही न करता राजकारण्यांना नाव ठेवणारे आणि ह्या सगळ्याचा, वृथा अभिमान बाळगणारे ' आपलेच ' भारतीय .
यात माझा पण बराच मित्रपरिवार आहे , जो माझ्याकडून नित्य नियमितपणे त्यांच्या ह्या असल्या स्वभावा बद्दल शिव्या खात असतो. असो !
मी नेहमीप्रमाणे सिनेमाची स्टोरी किंवा कुठलाही spoiler ( जो मी कधीच देत नाही)  देणार नाही, मला माहितीये,  सोशल मीडियावर आणि युट्युब वर काही विघ्न संतोषी लोकांनी बरेच spoiler आधीच दिलेले आहेत.
पण, धुरंधर 2 बघून..

पाकिस्तान किती घाणेरडा आहे हे कळतं
भारता विरोधी किती विष त्यांच्या मनात आहे हे कळतं
लियारी नामक जुन्या कराची मध्ये लोक कसे जगतायत हे कळतं
अत्यंत पाशवी नृशंस पैशाच्चीक मनोवृत्तीचे हे लोक त्याहून रक्तरंजित हिंसाचार कसा करतात हे कळतं
आपले भारतीय गुप्तहेर , आपले भारतीय जवान ,आपले ॲसेट बनून , किती वेगवेगळ्या पद्धतीने वर्षानुवर्ष त्यांच्यात राहून , मिळून मिसळून ,कार्यरत राहून ,आपल्या मातृभूमीची , निरपेक्ष भावनेने ,प्रत्येक क्षण धोक्यात घालून, I repeat , प्रत्येक क्षण धोक्यात घालून, किती सेवा करताय हे कळतं


2014 पासून बदललेल्या नेतृत्वामुळे ( मी ते मुद्दाम नाव घेत नाही,  नाहीतर आधीच प्रोपोगांडा म्हणून बोंबाबोंब करणाऱ्यांना आयतच कोलित मिळायचं ) खरंतर स्वातंत्र्य मिळालेल्या विचारसरणीमुळे आणि तितक्याच आवश्यक कृतीमुळे आपल्या भारत भूमीला आज युद्धकाळात सुद्धा आणि पूर्वी करोना काळात सुद्धा आज जग एकमेव आशास्थान म्हणून बघत आहे हे कळतं
आणि जाता जाता एवढेच सांगीन की माझा भारत एकेकाळी नाही,  अजूनही सोने की चिडियाच आहे आणि मेरा भारत महानच आहे आणि तो किती महान आहे हेही कळतं
​भारताने पाकिस्तान वर, घेतलेला हा Revenge, प्रत्येक भारतीयाला किती आत्मशांती देणारा आहे हे कळतं , इनफॅक्ट अनुभवायला मिळतं एक भारतीय म्हणून !
​आदित्य धर किती अभ्यासू लेखक आणि दिग्दर्शक आहे आणि रणवीर सिंग काय अफाट ताकदीचा अभिनेता आहे हेही कळतं

धुरंदर 1 थेटर मध्ये दोनदा आणि टीव्हीवर दोनदा बघितला
धुरंदर टू ची सगळीकडे अशीच पारायण होतील यात शंका नाही
जो खराखुरा भारतीय आहे त्याने धुरंदर 1 and 2 आत्तापर्यंत बघितलाच असेल
जय हिंद
🌹🙏🇮🇳
संजय सुभाष वेलणकर

असे reviews व सर्व लेख माझ्या Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

क्रांतिज्योती विद्यालय

The list