राजकारण आणि stakeholders

श्री 

राजकारण आणि stakeholders 
आजचा ब्लॉगचा विषय वेगळा आहे..वाचा आणि विचार करा..
राजकीय पक्ष असो ,कॉर्पोरेट कंपनी असो किंवा विश्वस्त संस्था (मग ती धर्मादाय असो किंवा बहुउद्देशीय ), जिथे चार व्यक्ती एकत्र आल्या तिथे राजकारण आलं आणि stake holders पण तयार झाले.
हे stake holders ज्यात, प्रामुख्याने संस्थेवर पैसे लावतात आणि संस्था कायम ताब्यात ठेवतात असे भांडवलदार..
दुसरा प्रकार म्हणजे ज्यांचा जनसंपर्क , ज्याला आजकाल connects म्हणतात, तो खूप असतो..असे, त्यांनाही संस्थेत अनन्यसाधारण महत्व असतं..उपयोग असे पर्यंत..
उरलेले सगळे मजूर असतात.
जे perform करतात त्यांना त्यांच्या ego व मोबदल्यासकट अशा कुशलतेने हाताळायचे असते की त्यांना वाटत राहत की संस्था त्यांच्यामुळेच चालते.
वास्तविक संस्था फक्त stake holders मुळेच चालत असते..
Performers बाहेर मोबदला दिला की हवे तेवढे उपलब्ध असतात.
शेवटचा गट असतो, तो incompetent म्हणजे कसलेही कौशल्य आणि आयुष्यात कसलेही मार्ग उपलब्ध नसलेल्या कळपाचा.. अशा , आणि म्हणूनच नाईलाजाने संस्थेवर निष्ठा असलेल्या सजीव अनुयायांचा..
त्यांना सतत असे जाणवून द्यायचं असत की संस्था आहे म्हणून तुझे अस्तित्व आहे नाहीतर बाहेर परिस्थिती कठीण आहे..
मग तो बिचारा तन,मन आणि धन एकवटून संस्थेसाठी राबतो..
अशांचे तन ही संस्थेची मोलमजुरीसाठी कायमस्वरूपी मालमत्ता असते, त्यांच्या मनाला कधीच संस्थेत किंमत नसते..
धन त्यांच्या निष्ठेचा ( तू आहेस म्हणून चाललय सगळं म्हणत) वापर करून आधीच ताब्यात घेतलेले असते..
आज आजूबाजूला लक्ष दिलेत तर अशा अनेक संस्था सोदाहरण बघायला मिळतील.
राजकारण हा माझा अत्यंत जवळचा व आवडीचा विषय..
मी माझ्या बऱ्याच पोस्ट मध्ये किंवा लेक्चर्स मध्ये सकारात्मक व बेरजेच्या राजकारणाबद्दल सांगत आलोय...
श्रीकृष्ण सकारात्मक तर शकुनी नकारात्मक राजकारणी नव्हता का?
राजकारण्यांना मी कधीच नावे ठेवत नाही.. अहो ते उघड उघड राजकारण करतात.. नाही का?
आणि म्हणून मला राजकारण आवडत नाही आणि मी त्यात नसतो म्हणणारा मनुष्य हा जगात सर्वात खोटारडा समजावा..
Politics is the ability to use people to achieve personal goals


जय हिंद
🌹🙏🇮🇳
संजय सुभाष वेलणकर

असे reviews व सर्व लेख माझ्या Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com



Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list