धुरंधर 1&2 The Music

श्री 

धुरंधर 1&2 The Music

एका सिनेमाचा तिसरा रिव्यू लिहिण्याची पहिलीच आणि कदाचित शेवटची वेळ असेल.
 मी, धुरंदर 1 आणि 2 हा एकच सिनेमा समजतो आणि आता जरा या दोन्ही सिनेमांच्या music बद्दल !
बघा, या सिनेमात जर का म्युझिकच नसतं किंवा जे म्युझिक दिलय , त्या प्रकारचं नसतं , तर कसा वाटला असता सिनेमा ?मला तर कल्पनाच करवत नाही, जुन्या नवीन गाण्याचा उत्तम संगम , गझल असो किशोर कुमारची गाणी पेरलेली असोत किंवा जुन्या गाण्यांचा रिमिक्स करून त्याच्यात आवश्यकता beats घालून जे काही सुंदर फ्युजन त्यांनी केलंय ते निव्वळ अप्रतिम !
नुसती गाणी नसून प्रसंगाला पण साजेशी अशी , त्या त्या प्रसंगा बरोबर गाणी पेरली आहेत , त्यामुळे ती गाणी आपण फास्ट फॉरवर्ड केली तर पिक्चरचा बराचसा कंटेंट Miss होईल.
अर्थात फास्ट फॉरवर्ड करवतच नाही तो सिनेमा..
शाश्वत सचदेवचे music ह्या अशाश्वत जगात अगदी शेवटपर्यंत म्हणजे शाश्वत राहील..
वानगीदाखल एकच उदाहरण देतो ते म्हणजे रमणा बालचंद्रन ह्यांचे फिर से गाण्यामधील वीणावादन..काय Impact आहे जबरदस्त..
मला नाही वाटत कुठल्याही सिनेमाचे एवढे reels किँवा प्रत्येक पात्राचा interview , podcast वगैरे झाला असेल.
परवा धुरंधर 2 तिसऱ्यांदा थिएटर मध्ये पाहताना मुद्दामून फक्त अर्जुन रामपालचा अभिनय पुन्हा लक्ष देऊन बघितला..
कोणी तरी म्हणाले होते की आम्ही सगळे जाऊ पण हा सिनेमा अजरामर होईल व लोकांच्या लक्ष्य राहील.
जाता जाता धुरंधर बद्दल अजून एक गोष्ट...
देशासाठी लढणारा गुप्तहेर व संबंधित माणसांची सत्यकथा,..पण ही कथा प्रत्येकाने आयुष्यात धैर्याने आयुष्याशी लढत कसे यश मिळवायचे हे शिकवते.
आयुष्यात प्रत्येकाला struggle आहेच..
अगदी नोकरदार सामान्य माणूस , रेल्वेने प्रवास करून नोकरी व आयुष्यात असलेल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून निवृत्त होऊन मृत्यूपर्यंत, व्यावसायिकांचे struggle वेगळे...
अजून कोणाचे अजून वेगळे.
तसा प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात धुरंधर असतोच.
पण आदित्य धर चा हा धुरंधर आपल्याला स्ट्रगल कसे हाताळायचे व कसे धैर्य राखत ध्येय गाठायचे हे चांगलंच शिकवतो..
आणि ही लढाई लढताना शाश्वत सचदेवाचे संगीत मनाला आवश्यक ती उभारी व चेतना पुरवत..
धुरंधर चा 3 reviews चा प्रवास आता इथेच थांबवतो.

जय हिंद
🌹🙏🇮🇳
संजय सुभाष वेलणकर

असे reviews व सर्व लेख माझ्या Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list