तगडा रह यारा

श्री 

247Orbit Health Compliance Camp Business Post
माझ्या सर्व ब्लॉग मध्ये मी जे काही अनुभवतो ते सांगायचा प्रयत्न करतो.
मग तो movie, webseries content, पुस्तक, एखादे स्थळ, आप्त स्वकीयांसोबत एखादा भेटप्रसंग, एखादा माणूस, किंवा एखादे गाव, शहर किंवा काहीही
जे काही मनाला आनंद देत, किंवा शिकवून जात , ते मी माझ्या ब्लॉगमध्ये मांडत असतो.
त्या सगळ्यातून जे आवडेल ते आचरण करणे तसेच ते अनुभव पुढे सांगत जाणे ह्याच्यासारखा दुसरा आनंद नाही.
फिटनेस हा सुद्धा असाच अवलोकन करून मी आधी स्वतः आचरणात आणला, आणि त्याचे योग्य ते फायदे लक्षात आल्यावर आणि अनुभवल्यावर आजचा ब्लॉग मी फक्त फिटनेस ह्यावरच लिहिणार आहे.
कामानिमित्त भारतभर अथवा परदेशात असताना फिटनेस ह्या विषया बद्दल , मी अनेक व्यक्ती, प्रकिया, समूह अथवा शिबिरे पाहिली, पण अनुभवाने असे लक्षात आले की ह्यात आरंभशूर खूप असतात. म्हणजे जॉगिंग अथवा वॉक साठी, ट्रॅकसूट, महागडे बूट, योगविद्येसाठी मॅट वगैरे सगळे करण्यापर्यंत अत्यंत हौस असते. आणि इथपर्यंत सगळं ठीक असतं.
पण जेव्हा त्यातून प्रत्यक्ष अंगमेहनत करताना घाम निघतो , त्या प्रक्रियेसाठी जेव्हा एखादी वेळ ठरवायला आणि द्यायला लागते , तेव्हा दुसऱ्या दिवशी किंवा पुढे त्यावेळेला उठून व्यायाम कण्याचा आळस नावाचा जो मानसिक प्रतिबंध असतो त्यावर मात करणे हा खरा अडथळा असतो.
जो कोणी हा अडथळा पार करतो तो ह्या मार्गात पुढे जातो.
हा ब्लॉग मी वाढवणार नाहीये , कारण फिटनेस हा बोलण्याची नसून कृती करण्याची गोष्ट आहे.
गेल्या आठवड्यात चेन्नई मध्ये मी चेन्नई टाइम्स ह्या पुरवणी मध्ये श्री मिलिंद सोमण ह्यांचा लेख वाचला.
त्यांनी लिहिलंय, फिटनेस मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सातत्य, consistency..
अणि हे कधी होईल? तर जेव्हा फिटनेस ही तुमची priority होईल, तुमची आवड होईल , तेव्हाच हे सातत्य तुम्ही राखाल.
मी स्वतः जगाच्या पाठीवर कुठेही असलो तेव्हा सुद्धा रविवार सोडून माझ्या ठराविक व्यायाम , वॉक आणि जॉगिंग ह्या activities  रोज चालू ठेवतो..अगदी सातत्याने..
ह्या ब्लॉग मध्ये , सोबत मी दिल्ली, गुरगाव, हैदराबाद, चेन्नई आणि कलकत्ता इथे असताना सकाळी उठून माझे jogging shoes आणि earplugs( होय, वॉक व जॉगिंग च्या वेळी गाणी ऐकणे अनिवार्य 🤩) घेऊन हॉटेल मधून बाहेर पडलो तेव्हा आजूबाजूच्या पार्क मध्ये चालू असलेल्या फिटनेस activities टिपल्या आहेत.
जाता जाता एवढेच सांगेन की फिटनेस मुळे मनामध्ये प्रचंड सकारात्मक ऊर्जा येते आणि ती दिवसभर काम करायला आणि आयुष्यात अनेक प्रसंगाला सामोरे जायला मदत करते.
फिटनेस बद्दल लवकरच मी शिबिर घेणार आहे..
त्याबद्दल माहिती देईनच, ज्यांना त्यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी जरूर संपर्क करावा..
चला तर मग, जागरूक व्हा आणि उद्यापासूनच कामाला लागा..
स्वस्थ रहा , मस्त रहा, 
जय हिंद !
ता. क. जोरदार पावसाळ्यात सुद्धा All seasons jogging shoes व छत्री सकट माझा फिटनेस workout व्यवस्थित चालू आहे.
🙏🇮🇳

संजय सुभाष वेलणकर 
9820536250

Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list