जिंदगी ना मिलेगी दोबारा
श्री
आजची पोस्ट , जिंदगी ना मिलेगी दोबारा , यामध्ये असलेल्या लहानपणापासूनच्या तीन मित्रांची !
सुरुवातीपासून सांगतो ,
काय झालं की , 15 16 17 मे , म्हणजे , परवापासून उद्यापर्यंत मी व माझी सौ ,माझ्या एका घनिष्ठ वर्गमित्र आणि त्याच्या सौ बरोबर त्याच्या पुण्यातील घरात, व नंतर दुसऱ्या दिवशी पुण्यातील आमच्या अजून एका घनिष्ठ मित्राच्या घरी राहायला जायचे ठरले.
पहिल्या दिवशी भुगावच्या मित्राच्या घराजवळचा तलावाच्या काठी सूर्यास्त , रात्री गप्पा, बाहेर घरगुती जेवण ,ice cream व गप्पा अशा भरगच्च कार्यक्रमानंतर , दुसऱ्या दिवशी पुण्यातील मित्राच्या घरी गेलो, त्याच्या इलेक्ट्रिक SUV मधून आम्ही पावना डॅमचा अप्रतिम निसर्ग अनुभवला , रात्री भरपूर गप्पा झाल्या, त्याच्या सौ नी केलेल्या गरम गरम खिचडी , गाणी , ice cream अशा कार्यक्रमानंतर ( ज्यात आम्हाला आमचा पुण्यातील अजून एक शालेय मित्रसुद्धा जॉइन झाला), तिसऱ्या दिवशी डोंबिवली घरी परत..
खर तर नाईट आउट हा कन्सेप्ट या नवीन पिढीने आम्हाला दाखवून दिला आणि तो आम्हाला करायलाही भाग पाडला आम्ही डोंबिवलीतही आमच्याकडे असे मित्र मंडळ नाईट आउट ला येत असतात.
काय असते मित्रांनो, की आम्हा शाळकरी मित्रांच्या म्हणजे आम्हा 55 ओलांडलेल्या शाळकरी मित्रांच्या आयुष्यात आता मुलं आपापल्या प्रावधानात जातात, त्यामुळे प्रत्येकाच्या घरी ते दोघेच अशी काहीशी परिस्थिती आहे.
शालेय आणि इतर जमवलेले मित्र मंडळ ह्यांच्याशी सतत संपर्क असतो, त्याचमुळे आता आमच्या पिढीने ह्या nightout च्या नवीन चालीरीती आम्ही पण आता अंगिकारल्या आहेत.
अशा मधून मधून , पण सातत्याने केलेल्या एका प्रकारच्या Micro reunion नंतर अक्षरशः खूप फ्रेश वाटते, एनर्जी मिळते.
पण पुढे एकत्र सहली outing हे ओघानेच आले.
आजचा विषय केवळ हाच होता,
आपणही असे करत असाल, नसाल तर अनुभवून बघा..
शाळेपासून टिकून राहिलेले आणि पुढे त्याचे एकमेकांच्या कौटुंबिक मैत्रीमध्ये परावर्तित झालेले हे मैत्र खरोखरच special असते.
आजमाके देखलो जनाब..!
पात्र परिचय
मी: संजय व श्वेता वेलणकर
मित्र पहिला: पुष्कर व मेघना जोशी
मित्र दुसरा: राहुल व कल्याणी पेंढारकर
मित्र तिसरा :पाहुणे कलाकार :श्री पराग डफळापुरकर
जय हिंद
🌹🙏🇮🇳
संजय सुभाष वेलणकर
असे reviews व सर्व लेख माझ्या Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..ही घ्या लिंक..
Comments
Post a Comment