इन्स्पेक्टर अविनाश Season 2

श्री 

उत्तर प्रदेश आणि बिहार प्रदेशाबद्दल , मला पुराण या विषयातील जाणकारांना आणि इतिहासकारांना नक्कीच भेटायला आवडेल.
असं काय आहे त्या भूमी मध्ये की जिथे एका वेगळ्याच स्तरातील गुंडगिरी अस्तित्वात होती ?
इन्स्पेक्टर अविनाश,  ह्या जिओस्टर वरील वेब सिरीज बद्दल म्हणजे त्याच्या पहिल्या सीजन बद्दल मी रिव्ह्यू लिहिलाच होता. इन्स्पेक्टर अविनाश मिश्रा ह्या उत्तर प्रदेश मधील दबंग पोलीस अधिकाऱ्यावर , त्याच्या कादंबरीवर, ही वेब सिरीज बेतली आहे.
आपण विचारच करू शकणार नाही , अशा थरातली गुंडगिरी , त्याच्या मागचं राजकारण , समाज आणि अर्थकारण याचा पूर्णपणे बिमोड करत एकेका नराधमाला संपवत सिस्टीम मध्ये राहून आपल्याच पद्धतीने काम करणारा पण 100% रिझल्ट देणारा असा हा इन्स्पेक्टर अविनाश मिश्रा !
हे करत असताना त्याच्या कौटुंबिक आयुष्यात निर्माण झालेली वादळे तो स्वतः महाकालचा निस्सिम भक्त कसे हाताळतो..प्रसंगी गुंडांसाठी स्वतः कसा महाकाल होतो..हेही बघण्यासारखे..
अर्थात , मी बाकी काहीही सांगणार नाहीये माझ्या नेहमीच्या पद्धतीने नुसार आणि घरचा अभ्यास म्हणून तुम्हालाही वेब सिरीज बघायला सांगणार आहे आधीचा गृहपाठ म्हणून 
सीजन वन बघा असेही सुचवणार आहे, 
हेच काय,  की सीजन टू च्या एंडला सीजन थ्री येणार आहे की नाही याची कल्पना सुद्धा मी तुम्हाला देणार नाहीये.
राजकारण आणि गुन्हेगारी याच्यावर बेतलेले प्लॉट ,ज्यांना माझ्यासारखे बघायला आवडतात त्यांना ही सत्य घटनेवर आधारित वेब सिरीज नक्कीच आवडेल. 
आता कसं आहे,  की धुरंदर नंतर सत्य घटनेवर आधारित , तशाच्या तशा रंगवलेल्या , आणि त्याच , मला बघायला आवडतात आणि बॉलीवूडच्या स्वप्नमय ,कल्पोकल्पित आणि खोटे नॅरेटिव्ह असलेले सिनेमे आताशा , मी काही बघतच आणि बघणारही नाही.
असो !
तर नक्की बघा,  इन्स्पेक्टर अविनाश on Jio Hotstar OTT..
आणि Season 1, बघितला नसेल, तर गृहपाठ म्हणून तो सुद्धा बघा आणि Season 2 चालू करा.

जय हिंद
🌹🙏🇮🇳
संजय सुभाष वेलणकर

असे reviews व सर्व लेख माझ्या Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list