Airport चे अंतर्गत विश्व

श्री 


Airport चे अंतर्गत विश्व
आजचा ब्लॉग खास एअरपोर्ट साठी..
Frequent fliers ना लक्षात येईल मी का आणि काय म्हणणार आहे ह्यात ते..
किमानपक्षी संदर्भ नक्कीच लागेल
तसा airport झोपत नाहीच..
आपली टॅक्सी departure जवळ आली की आपण ह्या विश्वात प्रवेश करतो. 
उतरल्यावर , trolley मग त्यावर ब्यागा लोड करणे हा कार्यक्रम झाला की आपण एन्ट्री checkpoint कडे जातो, बाहेरील निरोपाच्या भेटी, पहिलटकरांच्या अथवा शिकायला , नोकरीनिमित्त दीर्घकाळ जाणाऱ्यांचे नमस्कार चमत्कार आणि भावनिक प्रसंग , डोळ्यात साठवत आणि मनात कोरून आपण पुढे जातो.
पूर्वी नुसता ही documental security activity आधी बोर्डिंग पास बघून , बोर्डिंग पास सोबत आधार कार्ड बघत बघत होणारा तो प्रवास आता digilocker पर्यंत आला आहे. 
Digilocker वापरायला लागा, खूप सोयीचे आहे..
तर मग आपण पुढे येतो ..
मी नेहमी त्या एन्ट्री लेवल CRPF staff किंवा जो कोणी असेल त्याला जय हिंद म्हणूनच पुढे सरकतो.
मग आपण जातो ते आपल्या airlines काउंटरवर ,
आपले सामान सुपूर्द करतो आणि सामानाचा टॅग घेऊन पुढे सरकतो (इथे वजनी गट जास्ती असल्यास चलनी गटावर येणारा ताण लक्षात घेता मनात धाकधुक असतेच, येतानाच्या प्रवासात तर जास्तीच).
एअरपोर्टच्या बाहेरील अंतरंगात , आपण आता प्रवेश करतो.
इथून बुटांचे टाक टाक असे पण हळुवार आवाज आपल्या अवती भोवती येत असतात, मध्येच बऱ्याच ट्रॉलीज घेऊन जाणारा एखादा कर्मचारी दिसतो, मोहक अशा हवाईसुंदऱ्यांचा जथ्था डोळ्यांना सुखावत भर्रकन निघून जातो..
आजूबाजूला मंद संगीत instrumental आपल्याला भरवून टाकते, मध्येच एखादी मंजुळ announcement होते, मध्येच एखादी स्टाफ आपल्या किणकिणत्या पण गोड आवाजात विमान सुटते आहे, लवकर चला अशा आशयाची announcement करत येते.
Domestic International असे board बघून आपण त्याप्रमाणे दिशा बदलतो.
मग सिक्युरिटी चेक, इथे ट्रेज चे आवाज, मग सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू, leather shoes, पट्टे वगैरे काढून ट्रेमध्ये ठेवून, सिक्युरिटी समोर कवायती करून त्यानं आपल्याला तपासले की आपण ट्रे मध्ये काढलेले सामान परत घेऊन पुढे सरकतो.
(इंटरनॅशनल मध्ये Immigration counter , passport तपासणे, visa व फायनली डोळे तपासून आपण पासपोर्टवर शिक्कामोर्तब करून घेऊन आत येतो.
हे airport चे खरे अंतरंग.. बाहेरील जगाशी पूर्ण संपर्क नसलेले..
इथे न entry point security ची लगबग ,ना विमानाकडे सरकणाऱ्या प्रवाशांची गडबड.
सुशेगात असे स्वरूप असलेला हा एअरपोर्ट चा middle tier ..
प्रत्येक जण आपापल्या विश्वात..
जगातील सर्व ब्रँड व सर्व काही विकायला..
त्या झगमगाट व शॉपिंग भूलभुलैया कडून आपण हळू हळू all gates कडे सरकतो 
मग तिथे सगळे अगदी रांगेने आणि शिस्तीत बसलेले असतात, बोर्डिंग announce व्हायची सर्वांनाच घाई..
मग एकदाचे ते बोर्डिंग सुरू होते, 
Hello sir your boarding pass please अशा मधुर आवाजात आपल्याला विचारणा झाली की आपण बोर्डिंग पास or Digiyatra स्कॅन करून, हल्ली mostly आलेल्या aero bridge ह्या विमानतळाला विमानाशी जोडणाऱ्या interface मधून विमानात प्रवेश करतो.
आपल्या जागे वर बसून ,( मी mostly window seat च 😎) 'आपका लाया हुवा सामान सामनेवाली कुर्सी के नीचे ' ठेवले की, देवीयों और सज्जनो ही हाळी ऐकू येईपर्यंत कधी कधी एखादी डुलकी काढतो..
मग नंतर सुरक्षा संबंधी सूचना सुरू होऊन हळूच विमानाचे दार बंद होते आणि हळू हळू आपण धावपट्टी कडे सरकतो.
पुढील सरकणाऱ्या व वरून खाली झेपावणाऱ्या विमानांच्या मध्ये जेव्हा आपल्या विमानाचा no lagti tevha apan धावपट्टीवर येतो आणि आपकी यात्रा सुखद रहे असे म्हणत अलगद हवेत झेपावतो...

Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list