आयझॅक विवियन अलेक्झांडर रिचर्ड्स
श्री
आयझॅक विवियन अलेक्झांडर रिचर्ड्स,
I.V.A. Richards .. नाव मोठे, लक्षणे त्याहून थोर..
आज वाढदिवस आहे साहेबाचा, वय गुगलवर शोधा,
पण अशी माणसं चिरतरुण असतात..
गुर्मी, ज्याला हल्ली attitude म्हणतात तो फक्त अशाच माणसांनाच शोभतो.
Fast bowlers विरुद्ध हेल्मेट न घालणारा आणि तितक्याच मग्रुरीने त्यांना फोडून काढत त्यांची अक्षरशः पिसे काढणारा हाच तो कर्दनकाळ..
ज्यांना रिचर्ड्स बघायचाय त्यांनी रिचर्ड्स 189 against England गुगल करून बघा, बाँब विलिस ला यॉर्करला बॅकफूटवर येऊन कव्हर्स वरून छकडी..
बाकी त्याचे वन डे टेस्ट क्रिकेट सगळे रेकॉर्डस गुगल सांगेल, सांगू शकणार नाही ती तत्कालीन बॉलर्सची दुःख आणि व्रण..
उद्या इंडिया न्यूझीलंड फायनल आहे.
फायनल म्हटलं की मला अजून 83 आठवते.
कपिलपाजीने मागे धावत जाऊन पकडलेला catch आणि Cup सुद्धा..
परवा अक्षरने इंग्लंडच्या मॅचमध्ये त्या कॅचच्या आठवणी ताज्या केल्या.
कुठल्याही फायनलच्या आधी, अर्थात इंडिया फायनल मध्ये असल्यासच, आम्ही घरी 83 लावतोच.
आत्ता सुद्धा बघतोय...
जंजीर मधल्या अमिताभला जसे स्वप्न पडून दचकून उठायला लागायचे तसेच मला तो catch पाहून अजूनही घाबरायला होते..
विवने तो middle केला असता त्या दिवशी तर..
असा दराराच अजून आहे त्याचा..
Happy birthday King 🏏🌹🍫
असे reviews व सर्व लेख माझ्या Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com
Comments
Post a Comment