सुहास शिरवळकर
श्री
आम्हा पंचावन्नीत असलेल्या लोकांचे बालपण, अमिताभचे सिनेमे आणि तरुणपण आमच्या लाडक्या सुशि , म्हणजे अर्थातच सुहास शिरवळकर ह्यांच्या कादंबऱ्या वाचण्यात गेली.
मी त्यांना स्वर्गीय कधीच म्हणणार नाही कारण त्यांच्या लेखनशैलीने ते अजरामर आहेत.
सहज सुलभ पण अतिशय आकर्षक अशी लेखनशैली लाभलेले हे लेखक त्यांच्या प्रत्येक कथेतून त्यांचा त्या भूमिकेमागचा , शहर, प्रदेश अथवा कुठल्याही स्थळामागचा जो अभ्यास दर्शवायचे, तो अत्यंत वाखाणण्याजोगा होता.
कोर्ट दृश्य तर ते आपल्या लेखनशैलीने आपल्या डोळ्यासमोर उभी करीत असत.
त्यावेळेस वाटायचे की ह्यांच्या प्रत्येक कादंबरी व कथेवर एकेक सिनेमा ( आणि आता webseries सुद्धा) निघू शकेल.
मला वाटत The Train, मध्ये आलेला दुनियादारी ने सुरुवात झाली होती आणि आता अमेझॉन प्राईमवर , चक्क आपला अमर विश्वास आलाय.
तो स्टार हंटर्स ही कथा दाखवताना, सादरकर्त्याने ८० ९० च्या दशकातील कथा २०३० च्या दशकात अत्यंत सुंदररित्या उभी केलीय.
The mapping is too good.
आता बॅरिस्टर दीक्षित वेगळेच आहेत , आणि अमर विश्वास, राजीव खंडेलवालने खूप छान उभा केलाय.
बाकी सांगत नाही, तुम्हीच बघा अमेझॉन प्राईमवर...
मी आपलं लायब्ररीत जाऊन त्या स्टार हंटर्स कादंबरीची पुन्हा उजळणी करण्यासाठी आणली जाऊन...
पुन्हा तरुणाईत व भूतकाळात शिरतोय..
आता वाट बघतोय ती, मंदार पटवर्धन, त्याची रमी, कमिशनर केतकर मामा, डॅनी, फिरोज इराणी, दारा बुलंद, शीतल , बादल सलोनी..
कधी भेटतायत पडद्यावर आणि ते कोण कोण साकारणार आहे..
खरं आहे , ते गाणं आहे ना?
कोई लौटादे मेरे बिते हुए दिन
बिते हुए दिन वो मेरे , प्यारे पल छिन्
असे reviews व सर्व लेख माझ्या Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..ही घ्या लिंक..
Comments
Post a Comment