दलदल आणि मर्दानी ३
श्री
दलदल आणि मर्दानी 3
दलदलचा रिव्ह्यू लिहायच्या आतच मर्दानी 3 सुद्धा बघितला म्हणून आज दोन्ही एकत्र..
माझ्या अनेक लेखांमध्ये मी लिहित असतो.. मुलांचे बालपण खूप जपलं पाहिजे, लहान मूल हे मातीचा गोळा असतं.
जसा आकार द्यावा , तसं घडत, फार नाजूक आणि कोवळ मन असतं त्यांच.
अशा वेळी त्यांच्या मनावर फार भयंकर आघात करणाऱ्या घटना घडल्या तर ?
कितीजण why me असा प्रश्न विचारीत पुढे जाऊन जगावर सूड उगवायच ठरवतात? कितीजण त्याही परिस्थितीत झगडून, मेहनत करून, will power वर समाजाचे रक्षक बनतात आणि अशा व्यवस्थेशी लढतात?
अर्थात सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवाची कृपा आणि नशीब हे महत्वाचे फॅक्टर असतातच पण तरीही...
दलदल आणि मर्दानी 3 मध्ये एक कॉमन फॅक्टर मला आढळला तो म्हणजे अनाथ लहान मुलांचे संगोपन (?) केंद्र..
दलदल नावाप्रमाणेच दलदल आहे. तुम्हाला बघायला खूप धैर्य लागेल.. भूमी पेडणेकर , चिन्मय मांडलेकर सकट सगळे मराठी actors असलेली ही हिंदी webseries अत्यंत बारकाव्यांसकट गुन्हेगारी विश्वाचा हा भाग आपल्यासमोर मांडते.
मर्दानी 3 मध्ये राणी मुखर्जी, शिवानी शिवाजी रॉय अत्यंत दणक्यात ..
तिसऱ्या भागात गुन्ह्याची एक नवीनच पण अत्यंत भयानक अशी बाजू आपल्यासमोर मांडली आहे.
मी काही विश्लेषकांचे अनुक्रमे दलदल आणि मर्दानी 3 चे विश्लेषण वाचले , but no comments !
मला हे दोन्हीही content प्रचंड आवडले आणि मनाला थक्क करणारी गुन्ह्याची काळी बाजू ह्यात मला आढळली.
बाकी काही नाही सांगणार..
पाहूनच टाका आता मर्दानी 3 आणि उतरा एक प्रेक्षक म्हणून दलदलीत..
दलदल webseries on Amazon Prime
मर्दानी 3, movie in theatre
असे reviews व सर्व लेख माझ्या Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com
Comments
Post a Comment