भय
श्री
माझ्या आवडीच्या बिगबीच्या मूवी मध्ये ,सरकारमध्ये ,
एक डायलॉग आहे ,
सरकार म्हणतात ,
" मैं दुसरो के काम में दखल अंदाजी नही करता"
हा खरंच चांगला गुण आहे , पण माणूस , स्वार्थापोटी , अनेकदा असे अनेक गुण पायदळी तुडवत असतो .
माणसांशी वागणे असो किंवा निसर्ग, स्वतःला हवी तशी , स्वतःच्या स्वार्थासाठी , स्वतःच्या आवडीसाठी , छंदासाठी निसर्गामध्ये हवी तशी ढवळाढवळ करत असतो .
मग त्याचे फटके तर सहन करावेच लागतात.
एकदा माझ्या गुरूंकडून ऐकले होते.
निसर्गात अथवा कोणाच्याही नशिबात ढवळाढवळ करू नये.
मी आज जो रिव्ह्यू सांगणार आहे अथवा लिहिणार आहे , तो ॲमेझॉन एम एक्स प्लेअर ओरिजनल सिरीज मध्ये , भय, या अत्यंत भयानक पण वास्तवदर्शी सत्य कहाणी वर आधारित , अनेक सत्य घटनांवर आधारित वेब सिरीज आहे.
गौरव तिवारी नावाच्या एका माध्यमाची ही कहाणी आहे , Paranormal म्हणजे डिक्शनरीतील अर्थ अलौकिक , असे सांगत असला तरी , अत्यंत गूढ, पैशाच्चिक ,भूत प्रेत आत्मा यांच्याशी संबंधित असलेलं ,विज्ञानाबाहेरच शास्त्र. असं त्याचं वर्णन करता येऊ शकतं.
गौरव तिवारी या माध्यमाचा, मगाशी म्हटल्याप्रमाणे, माध्यम म्हणजे जो स्वतःच्या अंगी असलेल्या काही अशा अलौकिक गुणांमुळे आत्म्यांची संवाद साधू शकतो अशी व्यक्ती.
तर अशा या गौरव तिवारी बद्दल इंटरनेटवर बरीच माहिती आहे.
अत्यंत गूढ रित्या त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला हे देखील तुम्हाला वाचायला मिळेल.
तो या आत्म्यांच्या संपर्कात येण्यासाठी एक माध्यम म्हणून कसा ओढला गेला ,स्वतःच्या आवडीने कसा गुंतत गेला, गुरफटत गेला आणि त्यातच त्याचा कसा अंत झाला ही , तसं म्हटलं तर तीन वाक्यात चार वाक्यात सांगता येऊ शकणारी कहाणी आहे,
पण नेहमीसारखं मी अधिक काही सांगणार नाही कारण याच्यासाठी जे आठ एपिसोड्स आहेत ते अत्यंत भयानक, भयावक पण शब्दशः खुर्चीला खेळवून ठेवणारे असे उत्कंठावर्धक असे आहेत.
हे बघा , जे कोणी अशा कथा बघू शकतील , यातील चित्रण जे त्याहून अधिक भयानक आहे , त्यामुळे बघताना स्वतःच्या जबाबदारीवर बघा.
पात्रांची नावे ही मी इथे सांगणार नाहीये.
मूळ पत्र गौरव तिवारी रंगवलेला करन ठाकर , याचा मात्र विशेष उल्लेख करीन !
तो आपला स्पेशल ऑप्स मधला फारूख , त्याने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
या सिनेमांमध्ये बाकीच्यांची ही काम खूप छान आहेत.
नवीन कलाकार लक्षात राहण्यासारखे आहेत.
मला वाटतं अशा काही रोल्स मुळेच कलाकार समोर येतात ,त्यांचे काम लक्षात राहतं आणि मग ते पुढे स्टार म्हणून प्रसिद्ध होतात.
असा हा प्रवास खूप छान असतो , आयुष्यात एखादा चांगला रोल मिळाला की त्याचं सोन असा कलाकार करतो जो खराखुरा हाडाचा कलाकार आहे.
कुठेही एक क्षणही तुम्हाला कंटाळा येईल किंवा शांतपणे बसू देईल असा एकही सीन या वेब सिरीज मध्ये नाही .
तेव्हा पुन्हा सांगतो , स्वतःच्या जबाबदारीवर बघा , पण ज्यांना भयकथा ,नारायण धारप कथा, भयपट आवडत असतील त्यांनी मात्र नक्कीच बघा .
भय ! ओरिजनल ॲमेझॉन एम एक्स प्लेयर वेब सिरीज
बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..ही घ्या लिंक..
Comments
Post a Comment