बारामुल्ला आणि धुरंधर
श्री
खर तर बरेच दिवस झाले , एकत्रित रित्या बारा मुल्ला आणि नुकताच गाजत असलेल्या धुरंदर सिनेमा ह्या दोन्ही सिनेमांचे , (ह्याचे नावच धुरंधर आहे आणि नावाप्रम सिनेमासुद्धा ) रिव्ह्यू एकत्र लिहिण्यामध्ये दोन योगायोग होते , पहिला म्हणजे दोन्हीचे दिग्दर्शक आदित्य धर आहेत आणि दोन्ही मध्ये दहशतवाद आहे.
बारामुल्ला हा काश्मीर मधील आणि धुरंदर हा पाकिस्तानशी रिलेटेड आहे ,
आता पहिलं बारामुल्ला पेपर मध्ये आपण वाचत असतो बारा मुल्लामध्ये हे घडलं ते घडलं श्रीनगर आणि पुढचा एरिया म्हणजे पश्चिमेकडचा west ऑफ श्रीनगर till पाकिस्तान बॉर्डर , हा सतत धगधगता राहिलेला आहे.
कश्मीरी पंडित या विषयाबद्दल बरेच लिहिलं गेलं, बरेच सिनेमा निघाले , मी त्यात जात नाही , पण बारामुल्लाची कहाणी अशीच एका काश्मिरी पंडितांच्या कुटुंबावर आहे आणि ती आदित्य धर यांनी फार वेगळा रीतीने सादर केलेली आहे.
लोकल पोलीस, लष्कर, दहशतवाद आणि काश्मिरी पंडित अशी चतु:सूत्री, त्याच्या मागचे धार्मिक राजकारण वगैरे वगैरे....
पण या बारामुल्ला मध्ये शेवटी एक twist आहे म्हणजे काही गूढ घटना दाखवली आहे, त्याच्या भोवताली सगळं काश्मीरच वातावरण फिरत.....
अर्थात रिव्ह्यू म्हणायला मी एकच धागा याच्यात सांगतोय आणि नेहमीसारखं बाकी काही सांगणार नाही , हे बघा, एक अत्यंत अप्रतिम आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा असा हा सिनेमा आहे. बारामुल्ला by उरी ज्यांनी दिग्दर्शित केला ते आदित्य धर! हे कायम हिंदूंवर झालेल्या अत्याचारावर स्वतः ek काश्मिरी पंडित असल्यामुळे , त्या वेदना जवळून अनुभवल्यामुळे पाकिस्तान कडून कश्मीरमध्ये आणि पुढे, जो काही दहशतवाद आज जागतिकरित्या फोफावला आहे , त्याच्यावर factually based कथानक आणि त्या आधारे केलेलं प्रेझेंटेशन, सादरीकरण मस्त पैकी मांडू शकतात.
ऑडिटिंग field मध्ये असल्या मुळे फॅक्चुअल डेटा ला माझ्या दृष्टीने खूप महत्त्व आहे आणि तो तसा डेटा आदित्य धर, अक्षरशः निष्पक्षपणे , निर्भीडपणे सगळ्याच्या सगळा, जो आपल्यापर्यंत कधीच पोचला नाही, असा डेटा मांडतो.
तर मित्रहो, बारामुल्ला बघाच , बाकी मी काही सांगत नाही
बारामुल्ला by उरी ज्यांनी दिग्दर्शित केला ते आदित्य धर! ओन्ली on Netflix OTT.
आता धुरंदर बद्दल , हा review post करे पर्यंत सिनेमा तर मी एकदा बघितलाच आहे , अजून कितीही वेळा पाहीन.
बहुतेक जणांनी बघितला असेलच, ज्या पद्धतीने , तो बिझनेस करतोय त्यावरून त्याची वाढती लोकप्रियता लक्षात येऊ शकते.
(हा भाग वेगळा की आपल्याकडे बिझनेस कुठलाही मूवी करतो ) पण हा खरोखर मनापासून लोक बघायला जात आहेत.
26 11 चा दहशतवाद किंवा पाकिस्तान कडून दहशतवाद पोसलेला आणि वाढवलेला, त्यात ज्या काही बाबी, जे काही घटक आहेत, जी काही लोक कारणीभूत आहेत , त्या वेगवेगळ्या स्तरावरचे आणि त्यांना लाईटली घेण्यामध्ये आपलं तत्कालीन गव्हर्मेंट कसं कारणीभूत आहे , he सगळ्याचे इत्यंभूत वर्णन दाखवलेले आहे.
थोडक्यात सांगायचं तर हे सगळ्याचं फॅक्चुअल चित्रण करणे अगदी मायक्रो लेव्हलवर त्यांनी ते घेतलेलं आहेत, त्या घटना आपण पाहिलेल्या आहेत, पण मला खात्री आहे , ह्यात दाखवली आहेत त्या म्हणजे त्या दहशतवादी घटनांच्या मागील पाकिस्तानी कारवाया , छोट्या छोट्या बाबींसकट आपल्यासमोर मांडलेल्या आहेत , त्यामुळे नव्याने त्या घटना आपल्याला दिसतात, आणि त्याचा संपूर्ण पण संतापजनक अर्थ आपल्याला लागतो.
पण कुठल्याही मीडियाने हे कव्हर केल नव्हत किंवा कुठल्याही ऐतिहासिक दस्तावेजामध्ये हे अथवा त्याची मांडणी झालेली दिसत नाही .
आणि म्हणूनच तो आदित्य धर आहे.
झाले तो लोकांसमोर सत्य कायम मांडत आला आहे.
एखाद्या लग्नाला गेल्यानंतर एकाहून एक सरस पदार्थ जसे आपल्याला पाहायला मिळतात, काही गोड, काही तिखट , काही अति तिखट पण सर्वच चविष्ट... तशी जुन्या व नव्या उत्तम व गुणी कलाकारांची सरमिसळ यात दाखवली आहे.
रणवीर सिंग मेन कोर्स, संजय दत्त, अर्जुन रामपाल, राकेश बेदी आणि अक्षय खन्ना .
पूर्वीच्या काळी , आणि अजित आणि डॅनी किंवा आणि प्राण, आणि निळू फुले... अशा नामावलीमध्ये, या आणि नंतर आलेल्या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व होतं आणि ते तसंच या सिनेमामध्ये आपल्याला दिसतं.
अक्षय खन्नाचा ताकतवर अभिनयाचे सादरीकरण जे अत्यंत रहमान म्हणजे ,रहमानी आहे आणि तुमच्या हृदयावर नक्कीच डकैत घालतात
दर चार वर्षांनी , कहा ते इतने दिन यार , असं म्हणत तो गायब होतो आणि औरंगजेब , रहमान डकैत असे रोल्स करत आपल्याला सुन्न करून जातो.
जाता जाता अजून एक सांगतो, देशासाठी लढणारे जे गुप्तहेर असतात त्यांचा जीवन किती खडतर असते हे तुम्हाला यात बघायला मिळेल , ( एका गाण्यात , अक्षरशः भिकाऱ्यासारखा फेकलेल्या अन्नाचे तुकडे खात डोळ्यातून आठवणींचे आणि असहाय्यतेचे अश्रू गाळताना दिसतो , तो प्रसंग अंगावर शहारा आणतो.)
असो,
राजकारण आणि अर्थकारण करून जगातील, युद्ध घडवून आणणारे स्टार हेर बाँड सारखे असतात, त्याचे हे सिनेमे पाहताना, आपल्याला देशासाठी लढणाऱ्या अशा हेरांची किंमत कळणार नाही ..
बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..ही घ्या लिंक..
Comments
Post a Comment