ग्रंथ हेचि आणि हे सुद्धा गुरू

श्री 
ग्रंथ हेचि आणि हे सुद्धा एक प्रकारचे गुरू तत्वच !
मध्ये , श्री पराग पिंपळे ह्या कोकण वेड्या पर्यटकाने लिहिलेली सर्व पुस्तके विकत घेतली आणि ती वाचून काढली.
कोकणात जन्मलेला माणूस कोकणाबद्दल इतका माहितगार नसेल इतकी इत्यंभूत व सखोल माहिती ह्या खऱ्या खुऱ्या कोकणी माणसाने जमवली आहे आणि आपल्या पुस्तकांमधून आपल्या सर्व कोकणवेड्यांना , कोकण कसे बघावे व काय काय बघावे , ह्याबद्दल मार्गदर्शन केले आहे.
आता त्यानंतर मीना प्रभू ह्यांचे अपूर्वरंग , भाग १,
ज्यात फक्त श्रीलंका आहे.
आता कोकण दौरा आटोपून श्रीलंका वारी ह्या पुस्तकाद्वारे चालू केली आहे
ऑडिट, भटकंती, मित्र मंडळ , कौटुंबिक कार्यक्रम, ह्यातून थोडा वेळ घरी मिळाला की माझी ही घरगुती जवळजवळ ५०० पुस्तकांची साथसोबत असते.
अगदी प्रवासात सुद्धा वाचन थांबवत नाही.
श्री गुरुदेव दत्तांनी २२ गुरू केले असे म्हणतात.
म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे ग्रंथ हेचि आणि हेसुद्धा एक गुरूच.
श्री दत्तजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा 
🙏🌹

बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list