Trial, season 2
श्री
या वेब सिरीज मध्ये तुम्हाला खालील गोष्टी अगदी प्रकर्षाने जाणवतील त्या म्हणजे
कधी कधी ही तरुण मुल आपल्याला खूप काही चांगले शिकवून जातात म्हणजे आपल्या 50 55 इथून पुढे 60 ते 75 वय असलेल्या पिढीला सुद्धा ,
मुंबई जितकी दिमाखदार आणि स्वप्ननगरी वाटते तितकीच तिची एक काळी बाजू आहे.
म्हणजे साधारण तुम्ही अशा प्रकारचा गुन्हा असतो असं तुमच्या डोक्यात सुद्धा येणार नाही असे गुन्हे घडतात
अमर्याद रित्या जमवलेल्या संपत्तीचे मूळ चांगलेच असते असे नाही आणि मग त्यासोबत आलेल्या, पण नको असलेल्या गोष्टी सुद्धा आयुष्याची कशी वाट लावतात ,
अशा बऱ्याच गोष्टी या वेब सिरीज मध्ये तुम्हाला दिसतील आणि कळतील सुद्धा
बेसिकली ट्रायल ही वेब सिरीज सॉलीसीटर फर्म्स यांच्यावरच आहे.
आपण फोर्टला हिंटताना बऱ्याच ठिकाणी अगदी मोठमोठ्या अमुकतमुक असोसिएट अँड फर्म अशा लीगल ऑफिसेसच्या पाट्या बघतो ,
त्या फर्म्स मध्ये काय चालतं ,कुठल्या प्रकारच्या केसेस त्यांच्याकडे येतात आणि त्यातल्या खरोखरच किती सत्यासाठी लढल्या जातात इगो साठी लढल्या जातात ,एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी लढल्या जातात ,याच्याशी राजकारण कसं जोडलेलं आहे, त्या मध्ये कुठल्या प्रकारचा राजकारण असतं त्यातच काही जणांचे अनैतिक संबंध ,मग त्यांच्या कुटुंबावर त्याचा होणारा परिणाम ,मोठ्या कंपनीत बिल्डर्स आपल्या फायद्यासाठी कुठल्या प्रकारे खालच्या थराला जाऊ शकतात, त्यांच्यामुळे ज्यांची आयुष्ये उध्वस्त झाल्येत, त्यांच्यासाठी न्याय मिळवणारे वकील खरोखरच असतात का आणि असले तर त्यांना न्याय मिळवायला, कितीही मोठे असले तरी , काय काय कराव लागत ह्या व अशा अनेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला ट्रायल या जिओ हॉटस्टारच्या वेब सिरीज मध्ये पाहायला मिळतील.अर्थातच मी आत्ता त्याच्या दुसऱ्या सीजन बद्दल बोलतोय.
पहिल्या सीजनवर मी रिव्ह्यू लिहिलेलाच आहे , मला खात्री आहे की तुम्ही तो पाहिला असेल.
तर हा दुसरा सिझन फक्त सहा एपिसोडचा आहे , पण ते कधी संपतात हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही ,एवढा ग्रिप्पी म्हणजे पकड घेणार आहे
कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर जीशु सेन गुप्ता हा बऱ्याच फिल्ममध्ये व वेब सिरीज मध्ये अर्थातच हिंदीच्या आत्ताच्या दिसू लागलाय .
तो बंगाली फिल्म इंडस्ट्री मध्ये फार मोठा आणि चांगला नायक आहे. इथे तो काजोलच्या , जी एक प्रथितयश ऍडव्होकेट आहे तिच्या नवऱ्याच्या भूमिकेत एक राजकारणी म्हणून आपल्याला दिसतो .
सोनाली कुलकर्णीचा ही फार मोठा रोल आहे.
शिबा चड्डा किती ताकदवर अभिनेत्री आहे हे आपल्याला इथे पाहायला मिळतं.
तुम्ही तिला बंदिश बँडीट मधील आई, राधेची आई, जी डोक्यावरून पदर घेतलेली आपल्याला दिसते, त्याच्या अगदी वेगळ्या अशा एका कॉर्पोरेट लुक मध्ये पाहायला मिळते
आणि जाता जाता मी अगदी नेहमीसारखं सगळं काही सांगणार नसलो तरी दिलवाले दुल्हनिया पासून माझी आवडीची काजोल इथे अगदी लिड रोलमध्ये तुम्हाला दिसते , तिने तिच्या अभिनयाच्या अमर्याद छटा सगळ्या प्रसंगातून निर्माण झालेल्या भावना , त्यातली उत्कटता अत्यंत सुंदर रित्या दाखवलेली आहे.
आणि आपल्या दिवंगत असरानी साहेबांचा एक वेगळाच पण लक्षात राहणारा कदाचित शेवटचा किरदार आपल्याला बघायला मिळतो.
असरानी साहेब, आप अंग्रेजोके नहीं पुरे जमानेके जेलर रहोगे, आपकी यादोमे हम सब हमेशा कैद रहेंगे .
आता मी अजून काही सांगणार नाही ,
तुम्ही आता ट्रायलचा हा सीजन ट्रायच करा.
OTT आपला, Jio Hotstar
ह्याचे टायटल music खूप impactive आहे, तुम्ही skip intro नक्की नाही करणार...
बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
Comments
Post a Comment