शल्य, Forbidden Kingdom, शापित राजहंस आणि महिला दिन

श्री 

शल्य, Forbidden Kingdom, शापित राजहंस आणि महिला दिन ह्या ब्लॉगचे नाव मी मुद्दाम मोठे ठेवले आहे आणि ते त्या त्या व्यक्ती किंवा संघासाठी सूचक असे ठेवले आहे.शल्य, Forbidden Kingdom, शापित राजहंस आणि महिला दिन असे ते नाव आहे.परवाच आपल्या भारतीय क्रिकेट महिला संघाच्या मुलींनी अत्यंत अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करून साऊथ आफ्रिका हा बलाढ्य संघाशी खेळलेल्या विश्वचषक अंतिम सामन्यात दैदिप्यमान असा विजय मिळवला.दिवस होता नाव 2,2025.मला वाटते हा नवीन महिला दिन म्हणून साजरा करायला हरकत नाही.त्या मॅच बद्दल भरपूर लिहीन आलंय, मी जास्ती काही लिहित नाही.पण सामना जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर , एक वाक्य म्हणाली, अख्ख्या भाषणात ते मला खूप भावलं , ती म्हणते कशी?आम्ही इतके हरत होतो की जिंकणं हा एकच पर्याय आम्हाला आता उरला होता आणि मग आम्ही संघभावनेने खेळून जिंकलो आणि आता आम्हाला ती सवय करून घ्यायची आहे. हॅबिट करून घ्यायची आहे. मला वाटतं या तिच्या वाक्यातच अख्ख्या संघाची मानसिक स्थिती आणि कणखरता दिसून येते.कुठलाही विश्वचषक जिंकलेला संघ पुरुष अथवा महिला , कर्णधार इतके आत्मविश्वासात्मक विधान करताना आपल्याला दिसत नाहीत की आम्ही वर्ल्ड कप जिंकलाय, पुढच्या वर्षी आम्ही जिंकू पण हरमनप्रीत कौर ज्या आत्मविश्वासाने म्हणली की आम्हाला आता त्याची सवय करून घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्याला आता पुढील काही वर्ष असाच महिला दिन साजरा करण्याचा योग येणार असे दिसते आहे.सर्व महिलांना, महिला खेळाडूंना आम्हा भारतीय तर्फे खूप खूप शुभेच्छा !अर्थात अमोल मुजुमदार सारखा शापित राजहंस तुमचा कोच असेल तर मला वाटतं जोपर्यंत कोच आहे तोपर्यंत विश्वचषक भारताकडेच राहील हे खात्री बाळगायला काहीही हरकत नाही. आता या शापित राजहंसा बद्दल थोडेसे !रणजीमध्ये 30 शतके, पाच आकडीच्या वर धावा करूनही, कुठल्याशा गूढ कारणाने किंवा राजकारणाने अमोल मुजुमदार सारखा गुणी खेळाडू भारतीय संघात दिसू शकला नाही , किंबहुना एकही सामना खेळू शकला नाही हे भारताचे दुर्दैवच.तो अत्यंत दिग्गज खेळाडूंच्या कारकिर्दीमध्ये खेळत असल्यामुळे त्याचा योग आला नाही अशी विधाने बाहेर जरी दिसली तरी अंतर्गत कारण हे गूढच आहे आणि ते गूढच राहील. पण हा राजा जरी झाला नाही तरी किंग नाही क्वीन मेकर नक्की झाला आहे. भारतीय महिला संघ तिसऱ्यांदा अंतिम फेरीत ह्या वर्षी पोचला.ह्या आधी इंग्लंड ऑस्ट्रेलिया हेच संघ 25 वर्ष जिंकत आलेत.काही ना काही कारणांनी भारतीय महिला विश्वचषकापासून दूर राहिल्या , पण अमोल आला आणि त्यांनी त्याच्या पहिल्याच वर्षी प्रशिक्षक पदी , मुंबईचा क्रिकेट मधला जो खडूसपणा असतो never die approach असतो तो या मुलींमध्ये उतरवला. आणि आपण ऑस्ट्रेलियाला सेमी फायनल मध्ये हरवून , साउथ आफ्रिका फायनल मध्ये हरवून 300 च्या खालची म्हणजे कमी धावसंख्या defend करून विश्वचषक घरी आणला. अमोलचे हे योगदान भारतीय संघासाठी अनमोलच आहे. या महिला विश्वचषका मध्ये समालोचक म्हणून इयान बिशप हा वेस्टइंडीज चा एकेकाळचा जलदगती गोलंदाज , तुम्ही पाहिला असेल तर , भारतीय संघात साठी अत्यंत देशाने आणि आनंदाने समालोचन करताना मला तरी आढळला .स्पेशली ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका यांच्याविरुद्ध भारतीय महिला ज्या ज्या वेळी चौकार, षटकार अथवा विकेट मिळवायच्या , तेव्हा ह्याचा आनंद समालोचन करताना एखाद्या लहान मुलासारखा असायचा. हा स्वतः एकेकाळच्या Forbidden Kingdom मधला शिलेदार आहे.इथे Forbidden Kingdom, म्हणजे माझ्या सर्वात आवडीचा वेस्टइंडीज क्रिकेट संघ, Sir Clive Hubert Lloyd चा संघ.ते एकेकाळचे साम्राज्य , आता लयाला गेलेल असलं किंवा फारसे कोणी तिथे जाणं किंवा त्याबद्दल बोलणं असे नसणारे असले तरी एकेकाळचे पंधरा वर्षे अनभिक्षिक्त सम्राट होते ते क्रिकेटचे. 1970 ते 1985 ...पहिले दोन वर्ल्ड कप , 1975,1979 तर त्यांनीच जिंकले होते , अगदी सहजासहजी. वेस्टइंडीज चे ते दिवस , परत आलेले , मला वैयक्तिक बघायला खूप आवडतील, पाहूया ! कधी घडते ते ?आणि अगदी शेवटी, ऑक्टोबर 2023 मधला ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा चटका लावलेला, अजूनही लागणारा पराभव , विश्वचषक अंतिम सामना अहमदाबाद, हेच ते शल्य !मधे काही विजय आपण जरी मिळवले असले, तरी ते शल्य कायमचे निघून जाण्यासाठी 2027 चा दक्षिण आफ्रिकेत भरणार असलेला पुरुषांचा क्रिकेट विश्वचषक घरी येणे हा त्यावर एकमेव रामबाण उपाय आहे, माझ्यासाठी.So , Rohit , Virat , तुमच्या , कदाचित शेवटच्या विश्वचषकासाठी खूप खूप शुभेच्छा...तो लगान वसूल कराच ..अगदी सूत समेत जय हिंद🙏🌹🇮🇳🏏🏏🏏🏏

बाकी असे reviews व सर्व लेख माझ्याSanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..ही घ्या लिंक..http://sanjaysvelankar.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list