Afreen

श्री 

या गाण्यांमध्ये त्याने जो शेवटचा सा घेतलाय ना? 
तो ऐकण्यासारखाही आहे आणि बघण्यासारखा तर आहेच आहे
म्हणून हे मी ते खाली सांगतोय ते गाणं पूर्ण ऐका , म्हणजे बघा , युट्युब वर आहे 
कोक स्टुडिओ नाईन मधलं राहत फतेह अली खान आणि मोमिना मुस्तेशान यांनी गायलेलं म्हणजे (यात गाणे राहत फतेह अली खानचेच जास्ती आहे), ते म्हणजे गाण्याचे नाव, 
" आफरीन" 
गाणे असे आहे.. हुस्नेजाना की तारीफ मुमकिन नही"
आणि अगदी तसंच आहे , या गाण्याची तारीफ होऊच शकत नाही.. त्याला शब्द , वर्णच करू शकत नाही.
म्हणून 
खरं म्हणजे स्टुडिओमध्ये गाणं रेकॉर्ड होताना बघणं म्हणजे एक स्वर्गीय अविष्कार आहे. आपल्यासारख्या सामान्यांच्या तर आवाक्याबाहेरचा आहे ,पण इथे स्टुडिओत चित्रित झालेला गाणे म्हणजे कसा माहोल असू शकतो हे दाखवणारे हे गाणे आहे.
हे गाणं बघताना प्रकर्षाने मला जे जाणवलं , ते म्हणजे सगळे वादक जे आहेत ते आपापली वाद्ये वाजवत , हे गाणं ऐकताना इतके तल्लीन होऊन जातात की आपसूक त्यांच्या चेहऱ्यावर पसंतीचे हास्य उमटते.
आपण live orchestra madhye ase बरेचदा पाहतो .
हे सर्व बघून अंगावर रोमांच येतो .
आणि त्यात राहत फतेह अली खान म्हणजे बघायलाच नको , त्याचे हाय पिक्चर नोट्स ,स्वर ,शब्द ,टोन आणि आवाज... केवळ .. स्वर्गीय.
 मोमिना मुस्तेशान ही छोटीशी सहकलाकार सुद्धा अगदी तल्लीन होऊन त्याचं गाणं ऐकताना दिसते.
तर मंडळी, त्यामुळे आजचा हा रिव्ह्यू ,अगदी छोटासा असला तरी , फक्त या गाण्यासाठी.
 बाकी ,मी नेहमी सारखं तुम्हाला काही सांगणार नाही, तुम्ही ते गाणं बघताना ऐकाच आणि ऐकता ऐकता बघाच .
अर्ज किया है , हुस्नेजाना की तारीफ मुमकिन नही ..
व्हिडिओ सोबत दिलेल्या लिंक वर .. सौजन्य युट्युब 
आफ़रीन आफ़रीन (लाइव) https://share.google/IMVSZFbrh7R9RO4Nh 


बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com

© संजय सुभाष वेलणकर

Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list