13th
श्री
महाभारत काळात श्रीकृष्णाने अर्जुनाचे सारथ्य केले , तसेच त्याचा गुरु होऊन महाभारतात त्याला श्रीमद् भगवद्गीता हा जीवनाचा उपदेश करून यशस्वी कर्म करावयास भाग पाडले.
मित्रहो , हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे.
पण , आधुनिक काळात हे श्रीकृष्ण अर्जुन काही काळा पुरते महाभारतातील भूमिका निभावत असताना, पुढे जाऊन जर का अर्जुन श्रीकृष्णाची आणि श्रीकृष्ण अर्जुनाची भूमिका निभवताना दिसले तर ?
आणि शेवटी अर्जुन श्रीकृष्णाला उपदेश करून त्याचे सारथ्य करून एखादे युद्ध जिंकवायला मदत केली असे आपल्याला दिसले तर ?
आता माझ्या नेहमीच्या सवयीनुसार मी तुम्हाला पुढचं काही सांगणार नाही . पण ह्या मी वर लिहिलेल्या सत्यामध्ये तथ्य आहे की नाही हे तुम्ही बघू शकता 13 th ह्या वेब सिरीज मध्ये, Sonyliv OTT वर
आता हे 13, म्हणजे काय प्रकार आहे हे मी थोडसं तुम्हाला सांगतो.
सायन्स मध्ये अकरावी बारावी करीत असताना जे ई ई एंट्रन्स जर तुम्ही क्लिअर करू शकला नाहीत तर अजून एक पुढच्या अटेम्प्टला 13 असे म्हणतात ,म्हणजे 11,12 आणि 13 असा त्याचा अर्थ होतो.
ही कथा अशाच एका जे ई ई एंट्रन्स चुकलेल्या अत्यंत हुशार
विद्यार्थ्याची 13 वीत गेल्यानंतरची कथा आहे
अगदी छोटीशी म्हणजे पाचच एपिसोड असलेली ,ही अत्यंत भावनाप्रधान अशी कथा आपल्याला नक्कीच आवडेल आणि आपल्याला थोडेसे भावनिक नक्कीच करेल.
आणि या दिवाळीत एक काहीतरी खूप चांगले शिकायला नक्की मिळेल याची मला खात्री आहे .
तर मग माझ्या सोन्या चांदी सारख्या अनमोल मित्र परिवार हो व आप्त स्वकीय हो, येणारी मंगलमय दिवाळी तुम्हा सर्वांना सुखाची, समृद्धीची, भरभराटीची ,उत्तम आरोग्याची तसेच आध्यात्मिक भरभराटीची जावो अशी आम्हा वेलणकर परिवाराकडून आपल्या सर्वांना शुभेच्छा !
बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com
© संजय सुभाष वेलणकर
Comments
Post a Comment