Out house

श्री 

स्त्रीच्या सौंदर्याचे वयानुरूप बदलत जाणारे प्रकार असतात, 
मादक, शृंगारिक, आणि एका ठराविक वयानंतर सात्विक..
शर्मिला टागोर ह्यांना बऱ्याच वर्षानंतर full length रोल मध्ये पाहणे म्हणजे एक पर्वणी आहे..
ह्या सिनेमातून तिने केलेल्या किरदार ( असे मध्येच हिंदी शब्द पेरायला खूप मजा येते) मधून, ती एक प्रत्येक घरात अत्यंत हवीहवीशी वाटणारी सात्विक सौंदर्याची अशी आज्जीबाई वाटत राहते.
नातवासोबत तिचे प्रसंग खूप छान रंगले आहेत.
मुलगा म्हणून नीरज काबी आणि सूनबाई म्हणून सोनाली कुलकर्णी ह्यांची सहभाग उत्तम, त्यांच्यासोबत झालेली आज्जीबाईची interaction,  वेगवेगळ्या स्तरावर, खूपच छान.
सोबतीला आपले सर्वांचे लाडके आजोबा डॉ मोहन आगाशे म्हणजे मग काय विचारता, सुनील अभ्यंकर आपली छाप सोडून जातात..
महत्त्वाचे  म्हणजे जीहान होदर हा डंकी, गोल्ड मेडल मधला बाल सुपरस्टार म्हणूया इतका प्रभावी वाटतो, dog Simba ह्यांचीही प्रमुख भूमिका आहेच, जो ह्या कथानकाचा गाभा आहे असे म्हणता येईल.
डॉ मोहन आगाशेंचे नुकतेच आलेले असे छोटे दिडताशी (म्हणजे  दीड तासाचा, हा अजून एक माझा शब्द) चित्रपट हे बहुधा पुण्यात प्रभात रोड अथवा तत्सम विभागात चित्रित होतात, त्यामुळे ते मनाला अजून भावतात.
त्यात त्यांचे मध्यमवर्गीय शेजारी, रोजचा दूधवाला, पेपरवाला , मॉर्निंग वॉक अशा गोष्टी असल्याने तो चित्रपट अजूनच आपला वाटतो.
किती सांगतोय मी सिनेमा बद्दल, ते काही नाही !
आता तुम्हीच बघा अख्खा सिनेमा आपल्या Amazon prime OTT वर..
आजोबा आजी मुलगा सून नातू आणि पाळीव प्राणी ह्या सर्वांचे नातेसंबंध असलेला हा कौटुंबिक फराळ नक्कीच अनुभवा ..

बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com

© संजय सुभाष वेलणकर

Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list