Acting professionals
श्री
Side actors ( मराठीत तोंडीलावणे )
माझ्या या ब्लॉग मध्ये मी तुमची थोडी परीक्षा घेणार आहे बर का , म्हणजे filmy quotient, FQ check करणार आहे.
सर्वात खाली दिलेल्या webseries मधील side actors च्या कोणत्याही दोन famous webseries ची नावे मला 9820536250 ह्या माझ्या no वर पाठवायची.
काही साईड एक्टर्स जे नंतर स्वतः लीड ॲक्टर्स झाले, त्यांच्या नावावर सिनेमा किंवा वेब सिरीज चालायला लागले , बहुतांशी सगळ्यात म्हणजे त्यांच्यातले सगळे स्टेज म्हणजे एनएसडी किंवा एफ टी टी आय( आता हे काय आहे गुगल करा मी नाही सांगणार) चे यशस्वी विद्यार्थी होते, काहींना तर ऍडमिशन सुद्धा मिळाली नव्हती, नाकारली होती , पण पुढे जाऊन स्वतःच्या मेहनतीवर आणि अत्यंत कष्टाने , ते या स्वप्ननगरीमध्ये उभे राहिले आणि आपलं ध्रुव पद, ध्रुवस्थान त्यांनी निर्माण केलं , अगदी रसिकांच्या मनावर सुद्धा त्यांनी राज्य केले !
आज मी या सपोर्ट एक्टर्स म्हणजे (आपण मराठी मध्ये घरी जेवताना ताटामध्ये जे तोंडी लावणं म्हणतो, त्याच्याशी या सपोर्ट एक्टर्स ची तुलना करतो ) म्हणजे जेवणामधला मूळ पदार्थ म्हणजे जुन्या भाषेत हिरो हिरोईन व्हिलन , जसे पूर्वी काळी भाव खाऊन जायचे , तसे हे तोंडी लावणे. त्यांच्या बद्दल लिहिणार आहे.
पण आता सिनेमा अथवा वेब सिरीज हा प्रकार नुसता हीरो हीरोइन भोवती न फिरता , त्यात कथानक काय आहे याच्यावरती त्याच्या यशाची जास्तीत जास्त भिस्त असते
म्हणजे पूर्वी पण कथा असायच्या पण त्या कथेमध्ये काही अपवाद वगळता सपोर्टिंग एक्टर्स साठी फारसा वाव नसायचा असे माझे आपले स्पष्ट मत आहे म्हणजे क्रिकेटमध्ये बारावा खेळाडू यापेक्षा किंवा तत्सम...
तर मंडळी वेब सिरीज यायला लागल्यापासून म्हणा किंवा काही काही चांगले कंटेंट चांगलं म्हणजे चांगलं कथानक चांगलं कथा बीज जेव्हापासून येऊ घातलं आहे किंवा मी नेहमी म्हणतो इतर क्षेत्रातले मान्यवर आणि उच्च शिक्षित लोक जेव्हापासून दिग्दर्शन ,कथा (त्यातले काही एक्टर्स पण आहेत) पटकथा ,संवाद अशा क्षेत्राकडे वळू लागलेली आहे अगदी तेव्हापासून या सपोर्ट एक्टर्स ना एक चांगल कास्टिंग किंवा कथानकातले एक चांगले पात्र, महत्त्वाचे पात्र असे स्थान मिळू लागले आणि ते त्यांनी त्यांच्या सर्वांगीण अभिनयाने सार्थ ठरवलं आहे.
ते त्यांच्या पहिल्याच appearance मध्ये खूप प्रभावशाली व लक्षात राहणारे झाले, वानगी दाखल म्हणजे उदाहरणार्थ( मध्ये आपले आमचे जुने शब्द वापरतो मराठीत ,जे हळूहळू अस्त होत चालले आहेत) , नवाजुद्दीन सिद्दिकी तुम्हाला आठवते का ?सरफरोशमध्ये कुठे आहे हा पण तुमचा आजचा दुसरा होमवर्क आहे.
पण चला , सांगून टाकतो , मुकेश ऋषी जो आमिर खान बरोबर इन्स्पेक्टर असतो तो काही जणांना पकडतो आणि झोड झोड झोडतो , त्यावेळेला अत्यंत नैसर्गिक अभिनयाने खरंच मार खातोय असे वाटून ओरडणारा, अत्यंत बारीक असा आत्ताचा दिग्गज अभिनेता पण त्या वेळेचा सपोर्ट ऍक्टर आठवतोय का ?
तो नवाजुद्दीन सिद्दिकीच होता
तर तसे पुढे पुढे खूप प्रसिद्ध झालेले असे साईड एक्टर्स आता त्यांना खरंच support actors नको म्हणायला .
They are pure actors, who work as per their given task which is to play the role as per the allotted casting.( From look and feel to roleplay)
म्हणजे त्यांना निवडलेल्या किंवा कथानका मधील पात्रासाठी केलेल्या त्यांच्या निवडीच्या भूमिकेला साकारणे आणि ते इतकी योग्य साकारतात की त्यांच्या सिक्वेलमध्ये ते पात्र त्यांनीच साकारावे असे आपल्याला एक चित्रपट रसिक म्हणून वाटत राहते.
याचे अजून एक उदाहरण म्हणजे जॉली एलएलबी मध्ये न्यायाधीशाची भूमिका करणारा सौरभ शुक्ला !
म्हणून आता मी त्यांची व्याख्या म्हणजे , सहकलाकाराची व्याख्या सह कलाकार अशी न करता ,निवड झालेल्या पात्राला सुयोग्य न्याय देऊन ते पात्र जणू आपणच आहोत इतक्या प्रामाणिकपणे रंगवणारा सशक्त अभिनेता.
त्यांची कॉर्पोरेट मधील डेफिनेशन किंवा व्याख्या खालील प्रमाणे
Very competent, Acting Professionals who play or design the role as per the given cast
वेळप्रसंगी जो नायकालाही बाजूला टाकतो किंवा स्वतः नायक होतो.
पूर्वीच्या काळचं आमच्या वडिलांच्या वेळच हे उदाहरण म्हणजे मेहमूद ,त्याकाळी सहनायक आणि विनोदी अभिनेता होता पण मी अस ऐकलं आहे की दिग्गज नायक सुद्धा मेहमूद असलेले पिक्चर नाकारायचे कारण हा भाव खाऊन जायचा.
असो ! तर आजचा हा भाग खालील acting professionals ना समर्पित !
नीरज काबी,पियुष मिश्रा, राजेश शर्मा ,राजेश तेलंग, विशाल जेठवा ,कुमुद मिश्रा ,जयदीप अहलावत, गुलशन देवैय्या अलिफझल , हर्ष सिंग, अमित मिस्त्री, दिलीप शंकर, विजय वर्मा आणि विजय राज.
स्त्रिया सुद्धा काही कमी नाही त्याच्यात , आपली मराठमोळी श्रिया पिळगावकर, त्रिधा चौधरी, श्रिया चौधरी, दिव्या दत्ता रसिका दुग्गल, शिबा चढ्ढा ,रिचा चड्डा,
ही यादी खूप वाढू शकते ,खूप टॅलेंटेड लोकं या इंडस्ट्रीत आता आलेली आहेत आणि येणारा काळ खूप मनोरंजनाचा असणार आहे
(बरं ह्यात पंकज त्रिपाठी, केके मेननआणि मनोज बाजपेयी ही नाव नाहीये कारण ते आता सहकार नसून खरोखर बाप कलाकार झालेले आहेत )
बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com
© संजय सुभाष वेलणकर
Comments
Post a Comment