Kota factory
श्री
Kota factory
कधी कधी काही कथा कथानके आपल्याला इतकी गुंतवून ठेवतात ,की आपण ती पटकन संपवतो , वाचून अथवा बघून ! वेब सिरीज मध्ये तर हा बिंज वॉचिंग प्रकार आपल्या सर्वांना परिचित आहे.
मला वाटतं मी वेब सिरीज बघायला लागल्यापासून दोन दिवसात तीन सीजन इतकी झपाट्याने पाहिलेली ही पहिलीच वेब सिरीज असावी , कोटा फॅक्टरी !
नावाप्रमाणेच कोटा , राजस्थान येथील जेईई Aspirants म्हणजे साध्या भाषेत अकरावी बारावी आयआयटीची प्रवेश परीक्षेची तयारी करणारी महत्त्वाची दोन वर्षे ,अत्यंत महत्त्वाची दोन वर्ष !
येथे पंधराव्या वर्षी आपले पाल्य अत्यंत जीवघेण्या स्पर्धेत आयुष्याचा, मला वाटतं , अत्यंत थरारक काळ या दोन वर्षात अनुभवतो आणि त्याचे पालक म्हणून आपण सुद्धा !
मला वाटतं जेईई देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने ,दिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने सहकुटुंब ही वेब सिरीज पाहिलीच पाहिजे.
प्रत्येक सीझनमध्ये पाच एपिसोड असे ,तीन सीजन म्हणजे 15 एपिसोड मध्ये हा आपल्या पाल्याचा दोन वर्षाचा प्रवास अत्यंत बारकाईने दाखवला आहे,
राजस्थान मधील कोटा शहरात क्लासला ऍडमिशन, होस्टेल तिथे रुळणे, मित्र जमवणे, मेस मधील जेवण ,त्याच्यानंतर क्लास मधील सर, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स या तीन विषयांची जुळवून घेणे, समजून घेणे ,परीक्षा प्रक्रिया टेस्ट , क्लास चे mentor क्लासेस मधील जीवघेणी स्पर्धा परीक्षा ,विद्यार्थ्यांमधील मैत्री विद्यार्थ्यांचे सरांशी असलेले गुरु शिष्य नाते ...
आणि सर्वात शेवटी येणारे रिझल्ट्स , त्याच्यावरती प्रतिक्रिया त्याचे मुलांच्या आयुष्यावर होणारे परिणाम , चांगले वाईट आणि अशा बऱ्याच बारीक-सारीक गोष्टी अत्यंत विस्ताराने या वेब सिरीज मध्ये आपल्याला बघायला मिळतील.
कथानायक अर्थात जितेंद्र कुमार जे स्वतः आहेत आयआयटी खरगपूर मधून यशस्वीरित्या बाहेर पडले आहेत.
सध्या त्यांची पंचायत सिरीज गाजतेच आहे त्याचबरोबर ही कोटा फॅक्टरी सुद्धा !
नेहमीसारखं बाकी काही सांगत नाही ,
नेटफ्लिक्समध्ये हे 3 सीजन तुम्ही जरूर बघा , मला वाटतं या वेळेला मी उशीर केला , बाकी सगळ्यांनी कदाचित बघितली असेल , but if not, please watch.
आयआयटी 2022 मध्ये दिलेल्या jee entrance चा हा सर्व विद्यार्थ्यांचा प्रवास त्यांनी अत्यंत बारकाईने आणि रंजक असा दाखवला आहे
So let's drive down to Kota, Rajasthan .
म्हणून रिव्ह्यू सुद्धा बघितल्या बघितल्या post करतोय...
आणि हो, ही सर्व सिरीज ब्लॅक अँड व्हाईट आहे बरं का !
का , ते कळेलच, intellectual कारण आहे ते🤩
बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com
© संजय सुभाष वेलणकर
Comments
Post a Comment