इराणी गाथा
श्री
सध्या रिव्ह्यूलाला वेळ मिळत नाही .
बॅक टू बॅक ऑडिट्स असतात ,नंतर बरीच फॅमिली friends मध्ये फंक्शन होती , कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्या.
दरम्यान कंटेंट बघणं होतं , नाटक बघणं होतं , पुस्तक वाचणं होतं , पण आज मी खास review लिहीणार आहे तो इराणी गाथा या स्वर्गीय डॉक्टर मीना प्रभू यांच्या प्रवास वर्णनाच्या संचामधील , एक पुस्तक , त्याबद्दल, जे आता सध्या मी वाचतोय .
माझ्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या सर्व वर्ग मित्रांनी , मला मी खूप भटकतो, म्हणून मीना प्रभूंचा 17 प्रवास वर्णनांचा संच दिला, जो माझा आयुष्यभरासाठी आपल्या ठेव्यांपैकी एक अनमोल ठेवा आहे .
तर त्यातलं हे इराणी गाथा वाचतोय ,
पुस्तक वाचून माझ्या असं लक्षात आलं की आणि rather माझा असा दावा आहे की खुद्द इराणी माणसाने सुद्धा इतक्या भौगोलिक, सांस्कृतिक, व राजकीय बारकाव्या सकट आणि इतक्या गावागावात जाऊन इराण पाहिलेलं नसेल, इराणी संस्कृती इतकी जगली नसेल आणि त्यामुळे मी नेहमीसारखं सगळं काही तुम्हाला सांगत बसणार नाही त्यासाठी जो तुम्ही पुस्तक वाचाच.
सोबतच्या फोटोत दिलेय आणि हे पुस्तक वाचून येताना, म्हणजे पुण्याहून येताना मुद्दाम मी आपल्या त्या नवीन एक्सप्रेस मॉल च्या मध्ये जो पहिला , इराणी कॅफे आहे तिथे गेलो आणि चहा आणि बनमस्का वर ताव मारला.
इराणी गाथा वाचताना हि इराणी कॅफेमध्ये जाऊन चहा आणि बनमस्काचा आनंद घेतानाचा जो अनुभव आहे तो खूप छान आहे .
तर नक्की वाचा इराणी गाथा, मीनाताईंनी लिहिलेली
आणि मला सांगा आपले अनुभव ..
(आत्ता सुद्धा हा review मी आंबेजोगाई, तुळजापूर अक्कलकोट दौऱ्यावर प्रवास करताना लिहितोय )
बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com
© संजय सुभाष वेलणकर
Comments
Post a Comment