Myra Entertainment

श्री 

अस म्हणतात की काळ हे सगळ्यावर औषध आहे.
परवा पहलगाम मध्ये झालेल्या नकारात्मक घटनेवर काळ जो इलाज करेल तो करेल , पण परवाच आमचे नवनिर्वाचित ( हो, हल्ली मित्रमंडळ सुद्धा नवनिर्वाचित असत, जुन्या मित्रांना नव्याने भेटल्यावर त्यांचे नातेवाईक म्हणजे आपले नवनिर्वाचित मित्र , ही मी केलेली व्याख्या आहे, काही प्रॉब्लेम? 😅 ), कौटुंबिक मित्र श्री. संजय धात्रक ह्यांच्या Myra Entertainment च्या पहिल्यावहिल्या शो मुळे ( जो इतका सुंदर व श्रवणीय झाला की तो पहिलावहिला वाटतच नव्हता), सर्व रसिक एक सकारात्मक ऊर्जा घेऊनच घरी गेले हे मात्र खरे आहे.
 आयुष्यातली एक अप्रतिम संध्याकाळ, संजय म्हणजे, संगीतातल एक दर्दी व्यक्तिमत्व आपल्या शो मधील song selection ( मी नेहमी सांगतो , क्रिकेट मध्ये शॉट Selection आणि musical show मध्ये song selection हे अत्यंत महत्वाचे) मुळे स्वतः कानसेन असल्यामुळे त्यांनी अत्यंत चांगले तानसेन ,उत्कृष्ट गायिका व किंबहुना त्याहून सुंदर वाद्यवृंद समूहामुळे, 15 musicians, 
एक खरोखर सुंदर मैफिल..आम्हा सर्वांसाठी पहिल्या शो च्या निमित्ताने सादर केली.
आमचे जुने college चे मित्र व आजचे यशस्वी बांधकाम व्यावसायिक श्री. रवी गायकर यांनी संपूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन व शो organisation ही बाजू अत्यंत सुंदर सांभाळली, आणि आम्हाला एक खूप चांगले कौटुंबिक teamwork पहायला मिळाले.
संगीताचा मी किती शौकीन आहे हे आपण सगळे जाणताच..
आणि मग अशा धुंद गाण्यांच्या मैफिलीत मीही मग पंचावन्नाव्या वर्षी मित्रांसह आपलं footwork दाखवत पावले थिरकली..
संजय आणि रवी, पुन्हा एकदा धन्यवाद, आणि इथून पुढे Myra Entertainment ला खूप खूप शुभेच्छा !🌹🍫👍
पुढच्या आणि येणाऱ्या प्रत्येक शो ची आम्ही आता आतुरतेने वाट पाहू
बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com

© संजय सुभाष वेलणकर

Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list