पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर
श्री
एप्रिल 19, 2025.
आज मी माझ्या ब्लॉग मध्ये फक्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा विषय चर्चिणार आहे ( खूप चर्चा करणाऱ्याला इंग्लंड मध्ये चर्चिल म्हणायचे; माझा शाब्दिक कोटी असलेला PJ,
excuse me for this 😅 ).
तर आज माझी कार गॅरेज मध्ये पोचवल्यानंतर मला सोनारपाड्याला लगेच बेलापूरहून येणारी AC Bus मिळाली.
तिथून मी स्टेशनवर माझ्या पुढच्या कामांसाठी गेलो.
बसचे वाहक श्री सूरज पाटील आणि इतर प्रवाशांसोबत सुद्धा गप्पा मारत हाच विषय मी समजून घेतला व चर्चिला..
आमच्या डोंबिवलीत होऊ घातलेली मेट्रो पूर्ण झाली की आम्हीही मुंबईशी, नवी मुंबईशी जोडले जाऊ.
खरच public transport AC Bus, AC local , AC metro किती आरामदायक आहेत नाही?
मला वाटते की प्रत्येक प्राइवेट कार वाल्यांनी at least एक दिवस पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केला तर वाहतुकीवरचा ताण किती कमी होईल ना?
तसेच पर्यावरणावर पण किती सकारात्मक परिणाम होईल..
माझी कार संध्याकाळी service होऊन परत आली,
तरी सुद्धा , कधीकधी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर हा माझा निश्चय मी कायम ठेवणार आहे...
तुम्ही पण द्याल ना माझ्या ह्या पर्यावरणपूरक चळवळीला पाठिंबा, अर्थात सक्रिय.. बरं का !
😂😂
बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com
Comments
Post a Comment