खाकी सीझन २ बंगाल चॅप्टर

श्री 
एप्रिल 2,2025

ये अलग रंग है बंगाल का...
ह्या title song ने सुरुवात होणारी ही Netflix OTT वरील webseries खाकी ह्या नावाचा sequel आहे असे म्हणता येईल..
पहिल्या भागात बिहारचे राजकारण , गुन्हेगारी जगत आणि गुंडगिरी ह्यावर आहे तर आता हा सीझन बंगाल मधील त्याच तीन गोष्टींवर प्रकाश टाकतं..
आणि मग हा बंगालचा ' अलग ' आणि लालभडक रंग आपल्या अंगावर शहारा आणतो..
माझ्यासारखा, Crime हा genre( ज्या शब्दाचा उच्चार चॉनर कसा असू शकतो हे माझे अजून न सुटलेले कोडे आहे , त्याचा अर्थ म्हणजे catagory अथवा प्रकार), तर हा प्रकार ज्यांना आवडतो आणि म्हणून ज्यांनी खाकी , the bihar chapter पाहिलाय त्यांनी तर बघितलाच पाहिजे...
ह्यात तुम्हाला ...
बंदिश बँडीट मधला ऋत्विक भौमिक, (आपला राधे राठोड हो ! )
शागोर तालुकदार ह्या भयानक अवतारात दिसतो,
चित्रांगदा सिंग , विरोधी पक्ष नेतेपदापासून मुख्यमंत्री असा प्रवास करताना दिसते.
बरेचसे बंगाली स्टार्स मुख्य भूमिकेत दिसतात..
आणि सर्वात कर्तबगार आणि प्रामाणिक IPS बदली झाल्यावर निराश होऊन जात नाही तर आपल्या बुद्धीने अशा चाली रचतो की बास...
तर असा हा , IPS अर्जुन मैत्रा ज्या जीत मधानी ने रंगवलाय, तो मात्र जाम भाव खाऊन जातो..
राजकारण महाभारतापासून चालत आलंय..शकुनी आजही मोठ्या संख्येने आहेतच पण आजही काही कृष्णासारखे सकारात्मक राजकारणी आहेत म्हणून सृष्टीचे , आजच्या भाषेत सिस्टीम चे संतुलन कायम राहते...
आता नेहमीसारखे अजून मी काही सांगत बसत नाही..
पण जाता जाता एवढं मात्र नक्की सांगतो की हि नीरज पांडे दिग्दर्शित webseries आहे.
आता तुम्ही ठरवा बघायची की नाही ते....
 सातच episodes आहेत कधी संपतात काळातच नाही...

बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com

© संजय सुभाष वेलणकर

Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list