अक्षय आणि औरंगझेब

श्री 
3 मार्च 2025

आज विनोद खन्ना असता तर त्याला खूप ,म्हणजे तो खूप भरून पावला असता. स्पेशली आत्ताच रिलीज झालेले आहे छावा चित्रपटातील औरंगजेबाची भूमिका ज्या थंड आणि क्रूरपणे त्याच्या लेकाने, अक्षय खन्नाने साकार केली आहे ती बघून खऱ्या औरंगजेबाचाही, त्याच्या काळजाचा थरकाप उडेल.
 विनोद खन्ना हा अमिताभ नंतरचा , माझ्या मते एक आयकॉनिक हिरो होता आमच्या काळाचा, पन्नाशीतील लोकांचा , एक आवडता हिरो होता. 
 त्याने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात खलनायकी पासून केली आणि त्याची खलनायकी मेरा गाव मेरा देश या धर्मेंद्र सोबतच्या चित्रपटात खूप गाजली.
त्याबाबतीत अक्षय खन्नाचे वेगळं होतं. त्याने सुरुवातीपासून भूमिका फार सावधपणे आणि निवडून निवडून किंवा निवडक अशा घेतल्या. ऐश्वर्या राय सोबत चा पिक्चर, करिनासोबत हलचल,त्याच्यानंतर मध्यंतरी अजय देववण सोबत चा दिवानगी किंवा मधल्या काळाचे प्रत्येक सिनेमे हे अक्षय खन्नाची खास छाप सोडणारे होते.
अगदी नुकताच आलेला दृश्यम 2, त्याच्यामधील अशा छद्मी हसणाऱ्या आणि खोचक प्रश्न विचारणाऱ्या सीबीआय ऑफिसर ची भूमिका तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि ती आपल्याला आवडलेली होती दिल चाहता हैं, तर म्हणजे अमीर सैफ आणि अक्षय ह्या त्रयी ने धमाल उडवून दिली होती.
 त्या सिनेमांमध्ये आता आपण त्याच्या आत्ताच्या छावा सिनेमातील औरंगजेबाच्या भूमिकेबद्दल बोलूया.
 औरंगजेबा बद्दल मी बरीचशी पुस्तके वाचली आहेत आणि अनेक शिवचरित्र साहित्यातून , औरंगजेबाचे जे काही वर्णन केलेले आहे ते म्हणजे थंड नजरेने टोपी शिवत शिवत, दरबारातील घडामोडी बघणारा ,वेळ आली की निर्णय घेणारा अत्यंत सावध पावित्रा आणि अत्यंत क्रूर निर्णय या सगळ्या छटा अक्षय खन्नाने बेमालून दाखवलेल्या आहेत आणि ते characteristic छद्मी हसणं , डोळे बारीक करून पाहणं हे मला वाटतं औरंगजेबाच्या या भूमिकेला खूप सूट झाले आहे.
संभाजी महाराजांना त्यांच्या नऊ वर्षाच्या लढ्यामध्ये ज्या वृद्धावस्थेत औरंगजेब भेटला, दोनदाच, त्याची जी काय आजारपण ताप वगैरे वगैरे होतात त्या अवस्थेत त्याचे दिसणं , डोळ्याखाली काळे होतं ते मला वाटतं छावा टीमच्या मेकअप करू ने छान उभा केलाय.
पण त्यानंतरची असते ती महत्त्वाची व्यक्तिरेखा रंगवणे.
अक्षय खन्नाने जीव ओतलाय आणि म्हणूनच तुम्ही पाहत असाल की जितकं कौतुक, आणि ते व्हायलाच पाहिजे, विकी कौशल चे होते आहे तेवढेच अक्षय चे होते आहे.
राजसाहेबांनी आपल्या भाषणात सांगितले आहे, जदुनाथ सरकारचे औरंगजेब वाचा म्हणजे आपला राजा किती महान हे कळते. 
छावा बघताना सुद्धा हे जाणवतंय.
 छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणाची बातमी घेऊन जो दूत येतो , त्याच्यानंतर औरंगजेबाने अल्लाचे मानलेले आभार आणि माझ्या या जिगरबाज शत्रूला जन्नत मध्ये जागा ठेव ही केलेली प्रार्थन असो किंवा संभाजीला पकडल्यानंतर तो दूताच्या खांद्यावर हात ठेवून " मै और एक बार सुना चाहता हु " हा संवाद म्हणत असताना त्याच्या चेहऱ्यावरचे क्रूर छद्मी भाव अक्षयने उत्कृष्ट रंगवलेत. 
आपल्या आजोळच्या बुऱ्हाणपूर ची मराठ्यांनी केलेली हालत पाहून ज्या थंडपणे तो डोक्यावरील किमाऊंश खाली ठेवतो ते बघून त्याचे सरदारच काय आपण सुद्धा गोठतो.
लढाऊ मराठ्यांच्या विरुद्ध रणनीती आखताना आरामात पडून पोटावरील द्राक्ष सेवन करत असताना त्याची एक एक स्ट्रॅटेजी तो सांगतो ज्या पद्धतीत अक्षयने सांगितले त्याला तोड नाही.
आणि शेवटच्या काही दृश्यामध्ये तो वारंवार संभाजी महाराजांना सांगत असतो की तू इस्लामचा स्वीकार कर त्याला दिलेल्या बाणेदार उत्तरानंतर ज्या गुर्मीत , तो परत वळून त्याच्या छावणीत चालत जातो( त्याच्यात जरी थोडा अक्षय खन्नाचा चालीचा भास होत असला तरी) ती चाल खऱ्या ,गर्विष्ठ उद्दाम शहेनशहाचा रुबाब दाखवते ,नक्कीच दाखवते .
आणि नेहमीसारखं मी आता काही सांगत बसत नाही , तुम्ही मला खात्री आहे, तुम्ही छावा बघितलाच असेल.
 आपल्या हिंदूंना तर तो परत पहावा असं त्यात काही नाही निश्चितच नाही कारण शेवटची 25 मिनिटं त्याचं वर्णन मी इथे नाही करणार. 
 पण एक अजरामर राजनैतिक लढाई जी त्याकाळी युद्धभूमीवर घडवली गेली , त्याचे नायक आणि खलनायक माझ्या पोस्ट पुरता तर खलनायक तुम्ही नक्की बघा.
आपल्या लक्ष्मण उतेकरांचा छावा.
Truely, casting plays a very vital role in the film industry.
आणि माझ्या आवडत्या अक्षय खन्नाला असेच बहारदार रोल मिळत राहो .
जरी आम्हाला तो आमचा आवडीचा नायक असून या रोलमध्ये खलनायक म्हणून बघायला आवडला नाही तरी हा खलनायक त्यांनी खूप सुंदर रंगवलाय असं म्हणायला हरकत नाही.
आज औरंगजेब् ह्या क्रूरकर्म्याचा वध दिवस , नैसर्गिक मृत्यू , आजारपणाने मृत्यू म्हणजे नियतीने केलेला वध असं म्हणायला हरकत नाही आणि नेमका आजच तीन मार्च रोजी त्याचा हा वध मराठ्यांची हाय खाऊन झाला म्हणून हा पोस्ट प्रपंच म्हणजे ब्लॉग प्रपंच.

बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com

© संजय सुभाष वेलणकर

Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list