बंदिश बँडिट 2
श्री
दोन दिवस पुण्याला होतो ऑडिट साठी, पण आल्यावर BB2 means, बंदिश बँडीट 2 चालू केला, पहिला episode झाला होता बघून पहिला सीझन नंतर लगेच.
सुनील गावस्कर नेहमी म्हणतो बॉलरने स्टार्ट घेत दुसरा बॉल टाकायला वेळ दवडला नाही पाहिजे, तेवढं वेळ batsman साठी मिळतो settle व्हायला..
बीबी2 नेमका हेच करतो, एपिसोड by एपिसोड, तुम्हाला प्रेक्षक म्हणून वेळच देत नाही..विचार करायला..
Classical संगीताचे कसे आहे माहित्येय?
आपण म्हणजे श्रेष्ठ म्हणजे आपणच फक्त श्रेष्ठ, बाकी कुठल्या प्रकारचे संगीत जगात असूच शकत नाही.. मग आपले गाणे ऐकायला इन मीन दहा डोकी आली तरी चालतील, स्वत:च्या comfort zone मध्ये राहायचे...आणि इतरांना इतर प्रकारच्या संगीत प्रकारांना तुच्छ लेखायचे.. कुठलाही व्यावहारिक विचार न करणारे हे सो called पंडित आपल्या अहंगंड ह्या रोगामुळे घरादाराची होळी केल्याची अनेक उदाहरणे आहेत.. इथे BB मधला पण पंडित काहीसा असाच असतो..
पूर्वापार राजाश्रय असल्याने असे बरेच पंडित बोकाळले होते व स्वतच्याच दुनियेत जगायचे.
पण सीझन २ मध्ये Fusion ह्या नवीन संगीत प्रकारचा मुक्तहस्ताने वापर केलाय..आणि खूप परिणामकारक वापर केलाय.. फ्युजन किंग जो खूप सुप्रसिद्ध रॉकस्टार असतो तो हेच विचार व व्यथा मांडतो नेमकी..पटते आपल्याला.
गुरुपरंपरा आजही आहे, पण पूर्वीच्या outdated संकल्पनेला धरून नाही तर काळाप्रमाणे तीही बदलली आहे..
बीबी२ मध्ये नेमके हेच दाखवले आहे...
वरण भात चांगलाच आहे, पण त्यामुळे इतर खाद्य प्रकारांची चव व किंमत कमी होत नसते..
किशोर कुमार व SP Balasubramaniam कुठल्याही क्लास मध्ये गेले नव्हते वा शास्त्रीय संगीत गायले नव्हते..
म्हणून काही पंडितांनी(?) त्यांच्या बरोबर काम केले नव्हते म्हणे...
नुकसान industries चे झाले..
असो..
ह्या सीझन मध्ये पहिल्या सीझन सारखे काहीच नाही, पूर्ण वेगळे कथानक आहे...
राजकारणा प्रमाणे इथेही वेगवेगळ्या युत्या तयार होतात..
दिव्या दत्ताची भूमिका नवीन असून खूपच प्रभावशाली झाली आहे..
संगीत समारोह पासून Band India हा दोन सीझन मधील फरक खूप रंजक आणि बघण्यासारखा झालाय..
नवीन पिढी संगीताशी connect झाल्ये, पण त्यांच्या पद्धतीने..
तेल लावून भांग पाडून झब्बे घालून समाज वाद्यांसारखे चौकोनी सुतकी चेहरे करून शास्त्रीय संगीत म्हणणाऱ्यांविरुद्ध casuals मध्ये improvised आणि customised वाद्ये घेऊन फ्युजन निर्मिती करणारे हे आधुनिक पण कान तृप्त करणारे खरे खुरे गायक मनाला अधिक भावतात..
पुलंच्या असामी असामी मध्ये ते नव्या पिढी बद्दल काहीसे असेच बोलले आहेत , त्यांचे एक वेगळेच शास्त्र असते...
मला वाटते संगीत शिकणाऱ्या प्रत्येकाने मग कुठलेही असो, हे बंदिश बँडीट चे दोन्ही सीझन पाहिलेच पाहिजेत...
बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com
© संजय सुभाष वेलणकर
Comments
Post a Comment