पोस्ट लिहिणेस कारण की...


श्री 

आज दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी.....
मी स्वतः चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण असल्याचा मला जाज्वल्य अभिमान असला तरी...
ब्राह्मण , ब्राह्मणेतर हा मुद्दाच नाही ह्या लेखाचा..
किंबहुना हा मुद्दा मनात ठेवणाऱ्यांनी माझा हा लेख वाचूच नये
माझे राजकारणातील काही आदर्श आहेत..
मी staunch भाजपा follower असल्याने माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी, श्री अमितजी शहा आणि .माझे लाडके श्री. देवेंद्रजी फडणवीस.
इतर पक्षांतील माझे आवडते राजकारणी म्हणायचे तर
इंदिरा गांधी , संजय गांधी, आबा पाटील, विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण, मनोहर जोशी , हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, राजसाहेब ठाकरे आणि एकनाथजी शिंदे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थापन झाली त्या 1995 साली मी एका राष्ट्रीय पक्षातर्फे निवडणुकीला नगरसेवक पदासाठी उभा होतो, त्यानंतर माझा राजकारणात सक्रिय असा काहीही सहभाग नव्हता.
आत्ता आत्ता काही वर्षांपूर्वी आमच्या डोंबिवलीतील आमदार द्वयी श्री. रविंद्रजी चव्हाण व श्री. प्रमोदजी पाटील ( आमचे राजूदादा) ह्यांचे सोबत काही काळ काम करण्याची संधी मिळाली होती.
पण त्यामुळे राजकारणाची आवड मात्र कायमच राहिली आहे.
नंतर कॉर्पोरेट क्षेत्रात बरीच वर्षे काम करीत असताना सुद्धा राजकारणातील स्थित्यंतरे एक नागरिक म्हणून आवडीने बघत आलो.
पण गेल्या 5 वर्षात जे राजकारणातले रूप , अथवा दशावतार म्हणुया, पाहिले ते आत्तापर्यंतचे सर्वात थरारक होते.
( इथून पुढे काय काय पाहायला मिळेल हे ही unexpected असू शकते)
माझा हा आजचा लेख गेल्या ५ वर्षातल्या जनजीवनावर तसेच राजकारणावर असून त्याचे निमित्त आहे माझे अत्यंत लाडके राजकारणी माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस ह्यांच्या दमदार विजयी पुनरागमनाचे व त्याहून दमदार झालेल्या एकमेवाद्वितीय शपथग्रहण सोहळ्याचे.
करोनामय असलेला महत्वाचा कालावधी असलेली ही पाच वर्षे सर्वसामान्य व राजकारणी सर्वांनाच कठीण गेली.
स्पष्ट बहुमत नसले तरी युती बरोबर सत्तेचे दावेदार असलेल्यांना बाहेर बसायला लागणे, अडीच वर्षानंतर पुन्हा सत्ता हातातोंडाशी असताना द्वितीय स्थानात बसावे लागणे अशा नंतर माणूस खचतो, निराश होतो ,किमान react तरी होतो.
किंबहुना मुख्यमंत्री असताना व गेल्या पाच वर्षात ज्या घृणास्पद पद्धतीने त्यांना त्यांच्या कुंटुंबियांसहित troll केले गेले, त्यांना संपवण्याचे हर तऱ्हेने प्रयत्न केले गेले, त्यानंतर सुद्धा कोणीही पातळी सोडून बोलू शकला असता.
पण ज्या संयमाने त्यांनी सर्वांना भाषणातून , मुलाखतीतून उत्तरे दिली, त्याही पेक्षा कुठलाही जातीभेद न पाळता जोडीदारांना , संघटनेला सोबत घेऊन, स्वतचे व पक्षाचे output ज्या पद्धतीत वाढवले; 105 ते 132 , मला असे वाटते हे फार फार मोठ्या caliber चे exceptional असे उत्तर आहे.
ऑस्ट्रेलियन पद्धतीपेक्षा खराब sledging होत असताना संयमी पण संसदीय भाषेत आक्रमक पलटवार व आपल्या ' खेळातून ' आपले काम दाखवणे ह्यासारखे दुसरे उत्तर नाही.
मी माझ्या reviews सारखे जास्ती काही लिहीत नाही, पण आपण एक सामान्य नागरिक म्हणून आपल्या idol कडून नेहमी काहीतरी शिकले पाहिजे आणि आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात आचरणात आणले पाहिजे.
ह्या पाच वर्षात मला माझ्या लाडक्या देवा भाऊंनी खूप काही शिकवले आहे..
मी त्यांची , राजसाहेबांची भाषणे व मुलाखती नेहमी घरी, प्रवासात पाहत असतो, 
त्यातून हजरजबाबी व नर्म विनोदीशैलीत ( sense of humour) कसे बोलावे ह्याची बरीच टिपणे मिळतात.
आज ह्या शपथविधी नंतर प्रतिकूल परिस्थिती बदलून आपला झालेला अपमान एका अत्यंत दिमाखदार मानसन्मान सोहळ्यात कसा परावर्तित करता येऊ शकतो हाही धडा मिळाला.
आपल्या मराठीत एक म्हण आहे 
मान सांगावा जनात
अपमान ठेवावा मनात..
इथे ह्यांचा अपमान जनात झाला होता 
पण त्यांनी त्यांचा मान अत्यंत दिमाखदार पद्धतीने जनात आणि जनमानसांच्या मनात आज घडवून आणला.
देवेंद्रजी, आपल्या कणखर पण patient अशा व्यक्तिमत्त्वाला पुन्हा त्रिवार वंदन, ह्या दिग्विजयी पुनरागमन सोहळ्याबद्दल खूप खूप अभिनंदन व आपल्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा
जय हिंद!
जय महाराष्ट्र!!
🙏🌹🇮🇳


मी डोंबिवलीकर 
संजय सुभाष वेलणकर

बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com

© संजय सुभाष वेलणकर


 


 

Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list