Advay Foods, Maval, Pune Express Way
हा माझा मावळ प्रांतातला मित्र, समीर सातकर , पुण्याहून मुंबईला येताना एक्सप्रेस वे ने येताना देहू रोड टोलनाका ओलांडून पहिल्या फूड मॉल मध्ये ह्याचे अद्वय फुड्स म्हणून हॉटेल आहे.
त्याची स्वत:ची शेती असल्यामुळे घरचा इंद्रायणी तांदूळ, डाळ, ज्वारी बाजरी, त्यातून ते सगळे ऑरगॅनिक..
स्वतःच्या देखरेखीखाली अस्सल मराठमोळे पदार्थ
पिठले भाकरी, आपला हवा तस्सा वरण भात , तूप, मीठ लिंबासकट,..
लसूण चटणी, खर्डा, ठेचा, गूळ आणि त्यावर घरच्या दह्याचे ताक..
और क्या चाहिए?
मी हमखास पुणे अथवा पुढे कुठे लांब प्रवासाला गेलो की येताना समीरकडे जेवायला थांबतो..
येताना जेवणाबरोबर अत्यंत सुवासिक असा त्याच्या घरचा इंद्रायणी तांदूळ, भेळ भत्ता अशीही खरेदी करून येतो.
दोन दिवस पुणे दौऱ्यानंतर येताना त्याच्याकडे कालच जेवायला पुन्हा थांबलो होतो...
ताजे घरघुती ऑरगॅनिक आणि अगत्यपूर्वक वाढलेले जेवण ही समीरच्या अद्वय फुडस ची खासियत ..
तुम्ही पण येऊन बघा , नक्कीच आवडेल , तुम्हीही म्हणाल , मी पुन्हा येईन आणि पुन्हा पुन्हा याल...
कसे यायचे? अहो Google maps वर फक्त अद्वय फूड्स टाईप करा..सापडेल...
बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com
Comments
Post a Comment