तणाव 1 and 2
श्री
सोनी राझदान ला सारांश पासून बघतोय, तणाव मध्ये , (sony LIV OTT वरील काश्मीर विषयावरील 2 seasons ची webseries )
तिचा काश्मिरी जिहादी कुटुंबातील आई, खरे तर हतबल आई...हा performance खूपच matured आणि छान झालाय..
हरकत, ISIS, भारत पाकिस्तान आणि काश्मिरी जनता, आपली भारतीय सेना ह्यांची अगदी आत्ताच्या परिस्थिती वरील webseries खूप बघण्यासारखी आहे.
आत्ताच पुन्हा काश्मीर व लडाखला जाऊन आलो जुलै मध्ये, त्यामुळे सीरिज खूप connect झाली.
कोवळ्या काश्मिरी मुलांना जिहादमध्ये ओढून स्वतः नामानिराळे राहणारे काश्मिरी नेते, भरडली गेलेली काश्मिरी जनता, आपल्या भारतीय सैन्याचे कौतुकास्पद काम, लष्करी अधिकाऱ्यांच्या कौटुंबिक गोष्टी, त्यांचे दृष्टिकोन, तसेच आपण पेपर मध्ये चार ओळींची बातमी वाचतो अमुक अमुक अतिरेकी चकमकीत ठार झाला, पण ती अख्खी घटना किती साहसाने आपले सैन्य पार पाडते ते पाहून त्यातला थरार लक्षात येतो.
एका अख्ख्या जिहादी कुटुंबावर बेतलेली ही कहाणी प्रत्येक episode मध्ये रंगत आणते, कबीर बेदी अजूनही handsom वाटतो, बाकी अनेक कलाकार माहितीचे आहेत.
बाकी काही सांगत नाही नेहमी प्रमाणे..
हा थरारक तणाव तुम्हीच पण नक्की बघा
Sonyliv ott वर...
मागच्याच आठवड्यात राजस्थान हून आलो मारवाड बघून, तिथे जैसलमेर war memorial मध्ये एका सुखवस्तू घरंदाज वृद्ध स्त्रीला पॅकिंग असेच का नाही दिले ह्या क्षुल्लक गोष्टीवरून आपल्या भारतीय सैनिकाला इंग्लिश मधून शिवी देताना ऐकले.. आणि वाटले civilians ना आपल्या स्वातंत्र्याची किंमतच नाही, लष्कराची सुद्धा नाही...
मन विषण्ण झाले...
दोन शब्द ऐकवून आलो त्या बाईला..
डोंबिवलीकर आहे, सोडणार आहे का?
बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com
© संजय सुभाष वेलणकर
( राजस्थान दौऱ्यावर असताना फेसबुक मधून एक्झीट घेतली होती, आज परत जॉईन करतोय)
Comments
Post a Comment