The Monk
श्री
The Monk...
16*8=128 ( मराठी पाढे म्हणताना, सोळा अठ्ठे अठ्ठाविसासे)...
माझे शिक्षण मराठी मिडीयम मध्ये झालं असल्याने स्क्रीन कंटेंट शक्यतोवर मराठी हिंदी मग इंग्लिश ह्या क्रमाने पाहिला जातो.
पण आत्ताच मी Netflix OTT वर Monk ही 2008 सालची अमेरिकन टीव्ही सिरीज बघितली.
एक विशिष्ठ प्रकारचा psychological disorder असलेल्या , व प्रचंड OCD ( हे काय ते शोधा, आमच्या काळी ह्याला व्यवस्थितपणा म्हणायचे) असलेला अतीहुषार detective, त्याची ही कथा , त्याची टीम, ट्रुडी, नातली, डिशर आणि लिलांड...काय कसे कोण ते तुम्हीच बघा...
प्रत्येक episode मध्ये एकच कथा , जी शेवटी आपला कथानायक Adrian Monk कशी सोडवितो हा रोमांच प्रत्येक कथेगणीक १२८ एपिसोड्स मध्ये वाढत जातो व कधी संपतो हे कळणार नाही.
त्याच्या अतिव्यवस्थित पणामुळे निर्माण होणारी निखळ कॉमेडी, त्याच्या हुषारीची वेळोवळी दिसणारी चुणूक, त्याच्या एकाकी आयुष्याची कथा बघताना आपल्याला हसता हसता पाणावून जाते है नक्की...
ह्याहून त्याच्यावर 2023 मध्ये , Mr. Monk's Last Case: A Monk Movie असा सिनेमा पण निघाला होता तो jio cinema OTT वर आहे तो पण पहा, 2008-2023 , बदललेली परिस्थिती, माणसात झालेले बदल. आणि monk शेवटची केस कशी सोडवितो ते बघण्यात अजून मजा आहे..
' काहीशा निर्धाराने Adrian Monk डोंगरावरून खाली समुद्र किनाऱ्यावर उतरतो आणि त्याच्यामागे पांढऱ्या शुभ्र वेशभूषेत काही 100-200 माणसे खाली उतरत येतात...' हा शेवट पण रहस्यमय...
एक मात्र नक्की , पहिला एपिसोड बघायला सुरूवात केल्यानंतर १२८ एपिसोड्स व movie कधी बघून संपेल तुम्हाला कळणार सुद्धा नाही...
So be there with Mr. Adrian Monk...
बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com
© संजय सुभाष वेलणकर
Comments
Post a Comment