Brinda

खर तर मी जास्ती लिहीत नाही, ( बोलतो खूप, असे मित्र म्हणतात), 
पण कधी कधी काही content असे सुंदर मिळतात की लिखना लाझमी है.
आपले म्हणणे कमीत कमी वेळात नेमकेपणाने मांडता येणे म्हणजे संवाद कौशल्य. हा मुद्दा धरुनच माझे आता स्पष्ट मत झाले आहे की ज्या webseries 8 episodes मध्ये संपवलेल्या, न पेक्षा मांडलेल्या असतात त्या संपूर्ण webseries team चे संवाद व मांडणी ( presentation) कौशल्य दर्शवतात, 
yes, content तुमच्याशी बोलका पाहिजे, तरच तुम्ही involve होऊ शकता.
कालच ' interact ' केलेल्या Sonyliv OTT वरील ब्रिंदा,( वृंदा नव्हे) ह्या webseries ने 8 भागात अक्षरशः सुन्न केले.
कथा सुरू होते एका आदिवासी गावातून, ग्रहणाचा नरबळी, त्यात झालेल्या एका कुटुंबाची ताटातूट, त्यातील बहीण भाऊ आपल्या आयुष्यातील संघर्षाला तोंड देत एकमेकांना समांतर जात एका विचित्र टप्प्यावर एकमेकांना भेटतात..पुढे?
पुढेच काय ,  मधले पण टप्पे तुम्हीच बघायचे आहेत.
नेहमीसारखेच मी काहीही सांगणार नाही.
आज रविवार असल्याने , काल रात्री उरलेले ४ एपिसोड्स कसे संपले कळलेच नाही. इतका उत्कंठावर्धक content आहे, कहानी में ट्विस्ट पण आहे.
जाता जाता एवढेच सांगतो..
देव आणि धर्म , देवाचे भक्त आणि धर्माचे भक्त ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे, हे असे content पाहून पुन्हा पटते.
धर्म कुठलाही असो..त्यातला देव हा USP असल्यागत धर्मरक्षक(?) की profit center head ह्यांनी एक organisation करून चालवायचा प्रयत्न केला की गोंधळ होतो.
तोच गोंधळ दाखवलाय इथे..
तेव्हा ही अस्तिक नास्तिक लढाई बघाच...
Brinda on Sonyliv OTT 
(दाक्षिणात्य भाषेत original असली तरी हिंदी मध्ये available आहे )

बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com

© संजय सुभाष वेलणकर

Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list