मी पुन्हा पाहिलेले लडाख, अटलजी , लक्ष्य आणि LOC Kargil
श्री
मी पुन्हा पाहिलेले लडाख, अटलजी , लक्ष्य आणि LOC Kargil
2019 मे मध्ये पहिल्यांदा लडाख ला गेलो, घरी आल्यावर आवर्जून फरहान अख्तरचा लक्ष्य बघितला आणि JP दत्ताचा LOC Kargil बघितला, परवा , अगदी मागच्याच आठवड्यात पुन्हा लडाख बघितला, पण ह्यावेळी अगदी श्रीनगरहून सुरुवात करून लेह, लेह मनाली ते चंदीगड असा अगदी सागर संगीत बघितला.. तूर्तुक्, थांग, आपले सीमेवरील शेवटचे गाव, तिथे म्हटलेले राष्ट्रगीत..हे कायमस्वरूपी लक्षात राहील. आल्यावर पुन्हा लक्ष्य आणि LOC Kargil पाहिला.. ह्यावेळी मुद्दाम अटलजी सुद्धा पाहिला.
तिथली वॉर मेमोरियल व त्या जागा , त्यांच्या शौर्यगाथा हे प्रत्यक्ष अनुभवून मग त्या कथा व त्यांचे बलिदान ह्या सगळ्या गोष्टींची उजळणी करताना, अंगावर रोमांच व डोळ्यात अश्रू अनावर होतात.
अटलजी जाणून घेण्यासाठी त्यांचे चरित्र वाचले पाहिजे , कर्तृत्व समजून घेतले पाहिजे, कदाचित त्यांचा सहवास लाभलेल्या सुदैवी व्यक्तींना सुद्धा अटलजी कळले नसतील.
पण रवी जाधव ह्यांच्या मैं अटल हूं ह्या चित्रपटातून त्यांचे बालपणातील कौटुंबिक जीवन, संघाच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता , देशाचे पंतप्रधान, परराष्ट्र निती, कठोर निर्णय, अणुचाचणी, अमेरिकेला दिलेले परखड उत्तर..हे सगळे अनुभवायला मिळाले .पंकज त्रिपाठीने अटलजी अत्यंत जिवंतपणे साकारले आहेत.
पण जाता जाता अजूनही वाटते की आजच्या तारखेला कारगिल झाले असते तर आपण नक्कीच LOC Kargil cross करून surgical strike करून सगळे शिखर माथे सोडवले असते..इतर राष्ट्रांची परवा न करता, अगदी तुम्ही आधी घुसलात घरात तर आम्ही तुम्हाला घुसून बाहेर काढू ह्या नया भारत तत्वाने..
हे झाले असते तर आपले जवळ जवळ 500 जवान वाचले असते आणि 1200 जखमी झाले नसते..
अर्थात हे माझे मत, no comparison, त्यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी होती..
पण ज्या अवस्थेत आपल्या जवानांनी ती शिखरे सर केली आहेत, ती तिथे जाऊनच अनुभवा..
मी पुन्हा पुन्हा जाणारच आहे,लडाख वेड लावतच तुम्हाला...
बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com
© संजय सुभाष वेलणकर
Comments
Post a Comment