उत्तरोत्तर
श्री
कुठलाही लेखक आमच्या ऑडिटर सारखा निष्पक्षपाती असला पाहिजे , अगदी third umpire सारखा.
मीना प्रभूंच्या साऱ्या प्रवास वर्णनामध्ये हा निष्पक्षपाती दृष्टिकोन मला पाहायला मिळतो.
काहीजण दोन देश फिरले तरी भारताला नावे ठेवतात, ह्या लेखिका मला वाटते अख्खे जग दोनदा फिरल्या असतील, त्यांची (सारी प्रवासवर्णने वाचा), पण परदेशात सुद्धा जे चांगले ते चांगले व वाईट ते वाईट , अगदी fact finding आणि साग्र संगीत वर्णने असतात त्यांची,
आत्ता इंग्लंड मधील Southampton पासून आलिशान अशी Queen Mery 2 ची क्रुझ सफर घेऊन अख्ख्या Norway देशाच्या सर्व महत्वाच्या शहरांची भौगोलिक, सांस्कृतिक , निसर्ग सौंदर्य , जनजीवन, राहणीमान व पर्यावरण अशी सर्वांगसुंदर ओळख त्यांच्या उत्तरोत्तर ह्या पुस्तकातून मला झाली.
अख्खे पुस्तक वाचत असताना जणू मी सुद्धा त्या सफारी वर होतो असे मला वाटत राहिले.
तसे त्यांच्या प्रत्येक प्रवास वर्णनात त्या त्या देशाचे असे वर सांगितल्याप्रमाणे दर्शन घडते.
माझ्या सर्व वर्ग मित्र मैत्रिणींनी 4 वर्षापूर्वी माझ्या पन्नासाव्व्या वाढदिवसानिमित्त मला त्यांचा अशा 17 प्रवासवर्णने असलेल्या सर्व पुस्तकांचा संच , (माझा बऱ्याच अनमोल गोष्टींपैकी एक असा अनमोल ठेवा ) भेट दिला, तो मी सुद्धा असाच फिरत असतो म्हणून ...
सध्याच्या उकाड्यात अशी थंडगार सफर पुस्तकातून वाचताना सुद्धा खूप याद 'गार ' ठरली...
वाचा ' उत्तरोत्तर '..
बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com
© संजय सुभाष वेलणकर
Comments
Post a Comment