Silence 2

श्री 
महाराष्ट्राच्या एका खेडेगावात ,जेव्हा एका 14 वर्षाच्या मुलीची तिच्या घरात खरेदी होते , तिला गाडीतून घेऊन जात असताना , व्यवहाराचे पैसे आई आनंदाने मोजत असते आणि आजी डोळ्यात पाणी आणून नातीला तिचा मोबाईल चोरून देत असते , काही वाटल तर फोन कर सांगत असते.
हे चित्र आज भारतातील प्रत्येक खेडेगावात दिसत आहे.
तुम्हाला pre-wedding first night celebration चा demand (?) पुरा करण्यासाठी अशा कोवळ्या मुलींचा supply (?) होतो आहे, आंतर राष्ट्रीय लिलाव होतो.
कितीही काहीही म्हणा , Flesh Trade, Drugs, Pirates, बेटिंग हे दुर्दैवाने आज नुसते क्राईम राहिले नसून, एक international business झाले असून ह्या मागे आणि भोवती जागतिक राजकारण , अर्थकारण फिरत आहे.
कुठल्याही देशाला अथवा धर्माला किंवा व्यवस्थेला आज हे मोडून काढता येणे केवळ अशक्य होऊन बसले आहे.
ह्या सूत्राचा गाभा ठेऊन काही खून घडत जातात आणि मग
मनोज वाजपेयी आणि त्याची टीम त्याची कशी उकल , sorry अत्यंत रहस्यमय उकल करतात हे पाहण्यासारखे आहे.
आजकाल बदललेल्या तणावपूर्ण जगात जन्मापासून ज्या वातावरणात तुम्ही वाढता त्याचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो आणि तुमचे मानसशास्त्र घडत असते.
ह्याला बळी पडलेले अनेक नागरिक गुन्हेगारी मानसिकतेने आज सगळ्या स्तरावर आपल्या शेजारी पाजारी घरी, office , corporate क्षेत्रात वावरत आहेत. 
ह्यामुळेच Psychology clinics वाढत आहेत..
बाकी काही सांगत नाही.
हे सगळे असलेले Silence 2 अनुभवा ZEE 5 ह्या OTT वर...
बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
 Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com

© संजय सुभाष वेलणकर

Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list