Sanjay's Ashes
श्री
Sanjay's Ashes...
अजूनही आठवते आहे डेस्मांड हेन्स चा उजव्या गुडघ्यावर बसून मारलेला स्क्वेअर ड्राईव्ह , बाउंड्री क्रॉस करून चेंडू आत आला तरी तो त्याच गुडघ्यावर बसलेल्या पोझिशनमध्ये होता इतका फास्ट चेंडू गेला.
जेफ लासनचा स्विंग आणि कट झालेला चेंडू श्रीकांतला खेळता आला नाही आणि तो बीट झाला, पण तो बॉल अजूनही स्वप्नात येत असेल त्याच्या.
इमरान खानची 14 रन्स देऊन सहा विकेट घेतलेली आणि भारताला 124 रन मध्ये गुंडाळलेली ती मॅच ; नंतर सुनील गावस्कर ने स्लीप मध्ये पाच कॅचेस पकडून पाकिस्तानला 84 मध्ये गुंडाळले, ती शारजा मॅच
आमचे बालपण ना, अमिताभचे सिनेमे , क्रिकेटच्या अशा मॅचेस , ज्या आजही लक्षात राहत आहेत , असे पाहण्यात गेले मोठेपणी अगदी आत्ता आत्ता, आयपीएल सुरू होईपर्यंत सगळं कसं मस्त होतं.
क्रिकेटची मिनीएचर वर्जन निघायला लागली आणि त्यात बॉलर्स अक्षरश; निर्दयपणे ठेचून निघताना बघायला मिळाले.
20 ओवर्स मध्ये आता फक्त 300 किंवा 400 रन निघायच्या बाकी आहेत आणि ते केल्यानंतर त्या चेस होऊन मॅचही जिंकताना बघायला मिळू शकते.
एक जमाना होता की बॉलर्सच्या नजाकती, त्यांची फास्ट बॉलिंग त्यांची स्विंग कट, बॅट्समन बीट होताना बघणं , विकेट्स मिळणं टर्न होणारी पिचेस, फास्ट बॉलर्स ना मदत करणारी पिचेस, हे बघण्यात एक माझा होती..
हे आता मला वाटतं कालबाह्य झाले आहे.
क्रिकेट म्हणजे आता फक्त डोंबाऱ्याचा खेळ राहिलेला आहे कोंबड्यांच्या झुंजी सारखी फोर मारली सिक्स मारली मोठे र्स्कोर्स केले की प्रेक्षक आनंदी.
पाच पाच दिवस राहणाऱ्या टेस्ट मॅचेस, त्यातली खरी क्रिकेटची कला आता ओसरली आहे. पन्नास overs एवढा पेशंस कोणाच्यात राहिलेला नाही , आता ट्वेंटी-ट्वेंटी सुद्धा कंटाळवाणे वाटत असेल म्हणून असंही क्रिकेटचे 10-10 असे रूपही बाळसं धरत आहे.
मला अजूनही आठवते बेंगलोर ची ती मॅच सुनील गावस्कर 94 वेंगसरकर काहीतरी 90 करून, पाकिस्तानच्या तीनही स्पिनरला ज्या टेक्निकने खेळून काढत होते तो बॉल आणि बॉल अजूनही आठवतोय. हात हात भर वळणारा राजेश शर्मा मुरलीधरन चा चेंडू शेनवान यांची फिरकी गोलंदाजी आणि त्याची खेळताना उडणारी तारांबळ , स्लीप कॅचेस , क्लोजिंग कॅचेस आता मला वाटतं कालबाह्य होणारच आहे.
यात सर्वात कळस झाला तो नोव्हेंबरला आपल्या वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत, पूर्ण देश आशा लावून असलेल्या त्या दिवशी भारतीय क्रिकेटच्या आणि माझ्यासारख्या क्रिकेट वेड्याच्या दृष्टीने xx 11 चा काळा दिवस म्हणून लक्षात राहील.
अगदी आयुष्यभर लक्षात राहील
आठवी नववीत म्हणजे 1981-82 साली डोंबिवली हून शिवाजी पार्क ला संदीप पाटील ह्यांच्या गुरूंकडे , श्री. अण्णा वैद्य ह्यांच्याकडे प्रशिक्षण घेतले, पुढे cricket चालू ठेवले, 11/12 वी ला पेंढारकर ला ओपनिंग batsman म्हणून इंटर कॉलेज खेळलो, इंजिनिअरिंग मध्ये cricket सोडले तरी आत्ता आत्ता पर्यंत वयाच्या 54 व्या वर्षापर्यंत टर्फ क्रिकेट खेळत होतो.
क्रिकेट मध्ये अर्थकारण नवीन नव्हतं, Inside Edge webseries तिन्ही सिझन पाहिले आणि आत्ताच्या खेळात होणारी प्रचंड तडजोड समोर आली..
ही तडजोड सहन होत नाही आता..
त्यामुळे आता cricket सर्वार्थाने , एक रसिक आणि प्रेक्षक म्हणून पण सोडून दिलंय..एक समीक्षक म्हणून क्रिकेटवर लिहिलेलं हे माझं शेवटचं लिखाण ,...
So, This is right arm over ,
last one to go gentlemen ..
बाकी असे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com
Comments
Post a Comment