Maharani 3
श्री
माजघरात वास्तव्य असलेली 4 थी उत्तीर्ण गृहिणी घराबाहेर चाललेल्या आपल्या मुख्यमंत्री पतीचे राजकारण बघत असते आणि त्याला मधून मधून सल्ले देत असते.
तुला काय कळतंय असे धोरण ठेवणाऱ्या पतीचे पुढे काय होते हे बघण्यात पहिला season गेला.
दुसऱ्या season मध्ये एका गृहिणीचे रूपांतर धुरंधर राजकारणी मध्ये कसे होते आणि ती आपल्या पतीच्या व आपल्या शत्रूंशी कशी लढते हा प्रवास.
आता तिसरा season आपलं चौथी पुढील शालेय शिक्षण व राजकारण शिकून ती आता एक खरोखरच राजकारणाच्या पटावरील महाराणी होते का हे बघणे म्हणजे एक चित्तथरारक यात्रा आहे.
बिहारचे राजकारण ह्या विषयावर मी अनेक सिनेमे व webseries बघितलेत पण प्रत्येक कंटेंट मध्ये एक वेगळा बिहार दिसतो..
राजकारण मात्र सगळीकडे सारखेच..
तुम्ही प्यादे म्हणून कुणाच्या हाती लागून वापरले जाण्यापेक्षा आपला प्रवास शांत पणें करून आठ घरे पोचलात तर स्वतः वजीर होता.
असो..
आज महिला दिनाच्या निमित्ताने एक गृहिणी ते महाराणी ह्या व अशा अनेक अवतारात दिसू शकणाऱ्या नारी शक्तीला अभिवादन...
बघा Sony LIV वर महाराणी 3रा season...
बाकी हे reviews व सर्व लेख माझ्या
Sanjay's Box Office ह्या ब्लॉगवर वाचत राहा ..
ही घ्या लिंक..
http://sanjaysvelankar.blogspot.com
© संजय सुभाष वेलणकर
Comments
Post a Comment