बस्तर
श्री
Ecosystem vs System हा लढा आता पूर्ण लाल पट्टा म्हणून ओळखला जातोय.
पश्चिम बंगाल ते खाली केरळ असा हा भाग जिथून जिथून जंगलातून जातो तिथल्या आदिवासींचे वनाधिकाऱ्यांनी केलेले शोषण व त्या भागातील भूमीच्या उदरात आढळणारी खनिजे मिळवण्यासाठी ह्या पीडित आदिवासी समूहाला वाममार्गाला लावणारे वामपंथी आणि त्यामागे असणाऱ्या , वारेमाप पैसा व शस्त्रे त्यांना पुरवणाऱ्या परदेशी यंत्रणा व त्यांच्या पेरोल वर असणारा मीडिया अशा सर्व भारत विरोधी शक्ती एकवटून भारतात काही वर्षांपासून कारवाया करत आहेत.
ह्या सर्व अभद्र युतीचे केंद्रस्थान आहे छत्तीसगड राज्यातील बस्तर, ज्याच्या भोवती ही कथा ( की 1967 पासून 2010 पर्यंत चालत आलेली सत्यकथा?) फिरताना दाखवली आहे.
ह्यांचा जवळ जवळ 90 टक्के नि:पात आपली शूर भारतीय सेना जीवावर उदार होऊन वेळोवेळी कशी करत आली हे पाहण्यासारखे आहे. आता 2010 पासून 2024 पर्यंत हा नक्षलवाद बऱ्यापैकी संपुष्टात आला आहे.
आपण बातम्यात अथवा पेपरमध्ये ज्या दंतेवाडा चा संदर्भ पाहतो तिथे व ह्या वर उल्लेखिलेल्या लाल पट्ट्यात गेल्या 56 वर्षात (1967-2024) , भारत पाक युद्धात वीरगती मिळालेल्या जवानांच्या जवळजवळ दुप्पट तिप्पट संख्येने आपले जवान मारले गेले आहेत.
हे वास्तवदर्शी आकडे व As is where is म्हणजे जसे आहे तसे सगळे प्रसंग सिनेमात दाखवल्याने ते खूप भीषण आहेत व त्यातली सत्यता पटते.
ह्या सर्व दुष्ट शक्तींशी निर्धाराने लढून त्यांचा बीमोड करणारी वीर जवान व तिचे शूर साथीदार, शेवटी बाहेर शत्रूंशी व देशात ह्या सिस्टीम्सशी कसे लढतात हे पाहण्यासारखे आहे.
आपले किशोर कदम (सौमित्र), अदा शर्मा आणि अनेक ओळखीचे चेहरे आपल्याला ह्यात दिसतील.
नक्षलवाद्यांनी वस्ती जाळल्यानंतर एक वर्षाचे लहान मूल एकटे पडून रडत असते व त्या मुलाला सुध्दा ती स्त्री नक्षलवादी अजित फेकून देते..
माओचे चरित्र त्याचे सिद्धांत आपापल्या सोयीने वाचणाऱ्या वाम पंथी गटाने हा सोयीस्कर माओ वाद किती विषारी पद्धतीने ह्या पीडित समूहात भरून त्यांची स्फोटके केली आहेत हे ह्यात दिसते.
भारतीय लष्कराची 2010 नंतर ची भूमिका (कारण त्यांच्या हातात आता हक्क व चांगल्या यंत्रणा आहेत) ज्यात नक्षलवाद्यांशी लढा व त्यांच्याशी आवश्यक तिथे समुपचार अशा दोन्ही प्रयत्नाने आता हा रक्तरंजित प्रवास बऱ्यापैकी संपुष्टात आला आहे.
बरेच लिहिले असले तरी सिनेमाविषयी जास्ती ना सांगता तुम्ही स्वतः जाऊन theatre मध्ये हा भयानक प्रवास अनुभवा...
© संजय सुभाष वेलणकर
Comments
Post a Comment