Article 370

श्री

आपला मराठमोळा director आदित्य सुहास जांभळे आणि मराठमोळा actor वैभव तत्ववादी, आर्टिकल 370 चा प्रवास अगदी अथपासून इतिपर्यंत आपल्यासमोर उलगडतात हे पाहणे खरंच चित्तथरारक आहे.
पूर्ण उरीचीच टीम ,(काही कलाकार वगळता) , मात्र यामी गौतम ची मुख्य भूमिका असलेलं हे जवळ जवळ 2.30 तास अक्षरशः व शब्दशः खुर्चीला खिळवून ठेवणारे नाट्य , मला असं वाटतं , प्रत्येक भारतीयाने पाहिलच पाहिजे.
Article 370 हे नेमके काय हे, तुम्हाला खरंच जाणून घ्यायचे असेल आणि त्यामुळे आपल्या काश्मीरचे आधी काय नुकसान झाले, आणि ते कलम आता महत्प्रयासाने हटवल्याने काश्मिर हे पुन्हा कसे नंदनवन होतंय हे अनुभवायचे असेल तर आधी हा सिनेमा पहाच आणि नंतर तुम्हीच काय आम्ही सुद्धा पुन्हा एकदा आणि परत परत काश्मीर ला जाणार ह्यात काही दुमत नाही.
उरी जर पाया असेल तर हा नक्कीच कळस आहे.. 
खर म्हणजे , आपण सगळे आपल्या देशाबद्दल किती अनभिज्ञ होतो , की ठेवलो गेलो हे ही ह्यातून आपल्याला कळेल..
अजूनही त्या प्रत्येक फ्रेम मध्ये अडकलो आहे..
जाऊदे , त्याच भावनेच्या भरात मी अजून काही, आणि हळू हळू सगळेच सांगून टाकीन सिनेमाबद्दल ... तर असे काहीही होणार नाही.. उद्याच उठा आणि सहकुटुंब सहपरिवार मित्र मंडळ एकत्र जाऊन आर्टिकल 370 बघाच.. आम्ही आज 16 जण गेलो होतो बघायला तसे...
खर म्हणजे , शाळेशाळेतून हा सिनेमा आपला बदललेला भूगोल म्हणून आणि काळा इतिहास म्हणून दाखवला गेला पाहिजे ..आणि हो,  नागरिक शास्त्र पण खूप मोठ्या प्रमाणात शिकायला मिळतं ह्याच्यात, अगदी आपल्याला होत त्याच्यापेक्षा जास्त.. म्हणजे 20 मार्क्स पेक्षा खूप जास्त...
जय हिंद 🌹🙏🇮🇳

© संजय सुभाष वेलणकर 

Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list