Vaccum Cleaner

श्री

प्रपंच करावा नेटका , हेही अध्यात्माचे सूत्र आहे. काही काही विचारप्रवाह असेही सांगतात की संसार करून ब्रम्हचर्य पालन हे संसारात ना राहता ब्रह्मचर्य पालन करण्यापेक्षा खूप कठीण आहे.
असो, Vaccum cleaner ह्या नाटकाचा तो आशय नाही, पण संसारात , चौकोनी कुटुंबात पावलोपावली , मुले लहानाची मोठी करणे , करिअर, घर सांभाळणे आणि ह्यासारखे व इतर अनेक पण सगळेच गोड challenges असतात,आणि वयाच्या प्रत्येक टप्प्यात नवरा बायको हे हसत खेळत रुसत फुगत पार पाडत असतात, मुले सुद्धा मोठी होताना आई वडिलांच्या वागण्याकडे बारकाईने पाहत असतात, don't ignore that observation , I will tell you आणि मग सरकार मध्ये सांगितल्याप्रमाणे " वो तुम्हारे बारे मे अपनी राय बना लेते है "
चिन्मय मांडलेकर हा विषय मांडताना अत्यंत फार्सिकली, एका वेगळ्या ट्विस्ट ने ( जो मी नाही सांगणार ), वरील सर्व व अजून प्रश्न हाताळतात व आम्हा प्रेक्षकांना ते आपले वाटतात.
75 वर्षाचे श्री अशोकमामा सराफ आणि निर्मिती ताई सावंत केंद्रस्थानी असलेल्या जोडप्यातील जी energy व धमाल आणतात त्याला तोड नाही.
अशाच शॉपिंग मनिया की काय तो म्हणतात त्यात एक vaccum cleaner त्यांच्या घरात येतो आणि मग..पाहा तुम्हीच.
काल माझ्या आवडीच्या व नेहमीच्या A 14-15 ह्या दोन सीट्स वरून मी सपत्नीक हा Vaccum cleaner डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात enjoy केला. 

© संजय सुभाष वेलणकर 

Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list