Kannur Squad

श्री

3000 किलोमीटर एका साध्या नॉन एसी सुमोने केरळचे पोलिस , (फक्त 4 जण, जे अत्यंत खतरनाक अधिकारी म्हणून kannur squad ह्या नावाने ओळखले जातात) नेपाळ बॉर्डर जवळ बाबागंज नावाच्या गावाजवळील जंगलात जातात आणि कासर्गौड ह्या केरळ मधील एका बंगल्यावरील घडलेल्या दरोडा व बलात्कार ह्या घटनेतील आरोपींना पकडून घेऊन येतात..मध्ये मध्ये त्यांना काय काय दिव्यातून जावे लागते..
आरोपीचा पत्ता त्रेस होऊनही DYSP range नसल्याने विमान भत्ता मिळत नाही आणि एवढे अंतर एका जीपने तुडवत जावे लागते, जीवावर खेळून आरोपींना पकडण्यात यश मिळते तेव्हा स्क्रीन बाहेर आपल्याला सुद्धा तो रोमांच पाहून खूप आनंद होतो..
घटना , सत्य घटना आहे बरं का !
लीड रोल माझ्या आवडत्या मामुटिने केला आहे, मोहनलाल बरोबर मला मामुटी सुद्धा खूप आवडतो.. केरळ चे दोन बच्चन आहेत ते...
So enjoy Kannur Squad on Hotstar OTT


© संजय सुभाष वेलणकर 

Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list