ओले आले

श्री
गुजराथी सिनेमाचा त्याच producer व director ने केलेला हा मराठी remake आहे ( आता ह्यावरून पण चर्चा सुरू होईल 😅), South चा remake आपण नेहमीच पाहतो.
मूळ कथा अप्रतिम असली आणि त्याचे सादरीकरण त्याच पद्धतीने केले की एखाद्या चांगल्या डिश सारखा रंगतो...
गुजराथी चे मराठी रूपांतरण अगदी स्थळ पुणे व पात्राचे नाव सुद्धा चपखल. ( नाव नाही सांगणार)
सिनेमा बाप व लेक ह्या नात्यावर आहे.. अत्यंत खेळकर आणि पूर्ण वेळ हसवणारा हा movie एका वळणावर शेवटी तुम्हाला रडवतो. अगदी रंगलेल्या फायनल सारखा( नको तो फायनल चा विषय) , एखाद्या लेग स्पिनर सारखा आधी भरपूर धावा देतो पण एका गुगलीवर आपली विकेट घेतो.
आपले बँकेचे खाते आणि नाते ह्याची एकमेकांच्या होणारी ओढाताण खूप चांगली दाखवली आहे..मुलगा पैशाच्या मागे , घरात खूप सुबत्ता पण वडिलांकडे बघायला वेळ , अगदी पाच मिनिटे सुद्धा नाही. 
त्यातून हा भावनांचा रंजक प्रवास घडतो.
नेहमी प्रमाणे सिनेमा बघा मग म्हणजे हा प्रवास खरा खुरा घडेल.
नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर , सायली संजीव  मकरंद अनासपुरे..सर्वांची कामे उत्तम.. नाना सर्वार्थाने नानाजी आहेत इंडस्ट्री मध्ये , 
जाता जाता.. Animal , बाकीचा चोथा वगळता, वडील मुलाचे नाते तिखट प्रकारे मांडतो तर ओले आले एखद्या sweet dish प्रमाणे.. वडील मुलगा हे नाते पण जितके उत्कट पण अव्यक्त असते तसेच त्यावर फारशी चर्चा होत नाही पण आता त्यावर चांगल्या कथा लिहिल्या जातायत.. अच्छा है...

© संजय सुभाष वेलणकर 

Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list