Happy New Year 2024
श्री
कुटुंब , मित्रमंडळ , वाचन, राजकारण , क्रिकेट तसेच fitness, सिनेमा, खादाडी आणि भ्रमंती (अजून आयुष्यात काय असत म्हणा ? ) ह्या माझ्या अत्यंत आवडीच्या विषयांवर वेगवेगळ्या posts, comments, काही वेळेला आचरट तर काही वेळेला serious, तसेच माझे सिनेमा , webseries, पुस्तके ह्यांचे मी नेहमीच टाकत असलेले reviews चे रतीब ह्या सगळ्यांच्या साहाय्याने मी सोशल मीडिया वर व्यक्त होत असतो. अगदी वर्षानुवर्षे..ह्या वर्षी जरा जास्तीच आणि regular reviews लिहितोय..
तर मंडळी अगदी 2023 चे काही तास राहिलेले असताना सुद्धा धक धक ह्या Netflix वर आलेल्या एका उत्तम सिनेमाचा review लिहून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आहे.
दिल्लीतील चार बायका अचानक , अपघाताने , एकमेकांना ओळखत नसताना चक्क बाईक वरून खरदुंगला ( लडाख ) ला जायला निघतात..पुढे काय ते तुम्हीच बघा , अत्यंत रोमांचकारी प्रवास..
तेव्हा मित्रहो, तुम्हाला व तुमच्या परिवाराला हे नूतन वर्ष 2024 ( लिप वर्ष म्हणजे ४ ने निश्शेष भाग जाणारे वर्ष, मराठी medium चे माझ्यासारखे लोक समजतील 😀 ), असेच सकारात्मक, भरभराटीचे समृद्धी व सुख शांती पूर्ण जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना व ह्याच शुभेच्छा !
नवीन वर्षाच्या सुरुवातीला The Empire व दूता ह्या webseries चे reviews देईन
जय हिंद जय श्रीराम
🌹🍫🙏🇮🇳
Comments
Post a Comment