आमने सामने

श्री

लग्न संस्था आणि नाटक , रंगमंच ह्यांचे एक अतूट नातं आहे , पिढ्यानुपिढ्या...
ह्या वर अनेक फार्सिकल व बोधप्रद नाटके होऊन गेली..काही लक्षात राहिली काही विस्मृतीत गेली.
पण मंगेश कदम व लीना भागवत ह्या जोडीने सध्या 'आमने सामने'  ह्या नावाचे दोन अंकी नाटक आणले आहे, ते आत्ताच पाहिले.
मूळ गाभा लग्न असल्याने ते तसे चिरंजीव नाटक आहे. म्हणजे आम्हा 50 शी नंतर च्या साठी आमच्या आठवणी आणि आता काही वर्षात मुले लग्नाची होतील म्हणून त्यांच्या साठी अशी दोन्हीं वयोगटाच्या साठी हे एक all season असते तसे मनोरंजन आहे.
मंगेश आणि लीना हे एक माध्यम अथवा उतार वयीन जोडपे, मुलगा , सून व नात अमेरिकेत, त्यांच्या समोरील त्यांच्याच फ्लॅट मध्ये भाड्याने आलेले एक तरुण जोडपे अशा दोन टीमची ही गमतीशीर कहाणी आहे.
दोन अंक म्हणजे इंनिंग्ज आहेत , आधी ह्यांची बॅटिंग आणि नंतर त्यांची अगदी तुप्फान बॅटिंग...
आता तुम्हीच बघा मॅच tie होते की सुपर ओव्हर मध्ये जाते ते..
मी नेहमीप्रमाणे एवढेच सांगीन... बाकी तुम्ही नाट्य गृहात जाऊनच बघा...
नाटका नंतर मंगेशजींनी जो बाईट घेतला review चा त्यात मी तेच म्हटलंय , दोन्ही पिढ्यांचा समतोल ठेऊन लग्न संस्थेवर सादर केलेली अत्यंत मनोरंजक कलाकृती ..

© संजय सुभाष वेलणकर

Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list