Animal within us...
श्री
बरेच review वाचले, आता माझे मत व्यक्त करतोय..
कसं आहे की कुठलाही सिनेमा, नाते, मैत्री असो की एखादे ठिकाण असो मग त्यात देवस्थान पण आले, त्यात आपण काय त्यातून चांगले घेऊ शकतो हेच पहावे असे माझे मत आहे , असे असेल तर सगळे जग सकारात्मक आहे नाहीतर आपल्याला सगळे जगच आक्षेपार्ह वाटतं.
मी नेहमी तुलना करताना , साऊथ ची फिल्म इंडस्ट्री आणि बॉलिवुड अशी तुलना केल्यास साऊथ त्यातला भडकपणा सोडला तर नेहमीच उजवी आहे.
त्यातसुद्धा मल्याळी, केरळी कथाबिजे उत्कृष्ठ व जरा हटके...उदा: दृश्यम
आता वळूया अशाच एका दाक्षिणात्य निर्मात्याने दिग्दर्शित केलेल्या Animal कडे,
प्रत्येक लहान ,थोर , गरीब , श्रीमंत मध्यमवर्गीय असो, व्यक्तीच्या बालपणात, भूतकाळात काही ना काही दबलेल्या घटना असतातच, आयुष्य मऊभातासारखे कुणाचेच नसते. जनावर प्रत्येकात असतेच आणि ते व्यक्त वेगवेगळ्या पद्धतीने करतातच प्रत्येक जण.
इथे सर्वांना परिचित असलेले, भावंड, sharing, भरपूर estate, मग त्यावरून वाद, इथे तर अगदी रक्त रंजीत ' वाद '.. कथा बीजामधील एक सूत्र हे, दुसरे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वडील आणि मुलगा , ह्यांच्यातील अव्यक्त प्रेम..
पुरुष आपले प्रेम व्यक्त नाही करू शकत हेच खर..
कधी कधी तर वडील गेल्यावर कळत मुलाला की आपले वडिलांवर खूप प्रेम होते..
लहानपणी आपले आदर्श असलेले वडील , आपली प्रत्येक कृती त्यांना impress करण्यासाठी असते.. आणि वडील त्या कृतीचे कौतुक असूनही का कोण जाणे ' खूप छान केलंस ' असे स्पष्ट व्यक्त नाही होऊ शकत मुलाबाबत..आणि मग मुलाची होणारी घुसमट.. आणि जोडीला फॅमिली मध्ये ( इथे family हा शब्द गॉडफादर मधील family इतका अर्थपूर्ण , इतकी ती family भारतातील एक no उद्योग समूहाची family असते ) होणारे व्यावसायिक की कौटुंबिक वादातून झालेले हल्ले ह्यामुळे त्या मुलातील जनावर म्हणजे Animal जागे होते, फोफावते आणि एक राक्षस बनते..कारण एकच वडिलांना काहीही झालेले त्याला बघवत नाही, आणि त्यासाठी तो ज्या मर्यादा ओलांडत जातो , त्या बापाला पाहवत नाहीत...
बास, मी ह्या सिनेमातून हेच घेतले आणि मला तर बाबा भावले हे कथा बीज आणि सादरीकरण, अत्यंत practical सादरीकरण... जे जसे , त्या समाजातील class मध्ये घडते तस्सेच्या तस्से दाखवले आहे आणि म्हणून पु.लं च्या भाषेत ' अब्रमण्यं ' म्हणणाऱ्यांना ते झेपायचे नाही. ( Reference: रावसाहेब, पु. ल. कथाकथन)
ते जनावर रंगवले आहे रणवीर कपूर ने, थोडी संजू ची पुढची झाक वाटते.. पण storyline ला suit होत्ये,
त्याचा बाप रंगवला आहे मास्टर ब्लास्टर अनिल कपूर ने,.. बाकी star cast सुद्धा तगडे,
बॉबी देओल शेवटचा अर्धा तास येतो आणि लक्षात राहणारी खेळी खेळून जातो आणि आपण सगळे ते अवाक होऊन मूक पणे पाहत जातो..
बाकी नेहमीसारखे तुम्ही बघा , गाणी काही अती उत्तम , (mostly Punjabi, त्यामुळे सध्या Jogging ला earplugs लावून तीच ऐकतोय🎻😄 )
धाकट्या लेकाबरोबर मुद्दाम बघितला परवा..
कारण आपण सगळेच लहान असतो, आपल्यात सगळ्यात जनावर असत आणि आपण आयुष्यात बाप होतो...
तो कलियुगातील ह्या सगळ्या अवस्था एका बिझनेस हाऊस च्या कुटुंबाची case study म्हणून बघायची असेल तर हा ' Animal ' पहाच....
© संजय सुभाष वेलणकर
Comments
Post a Comment