आजकालचे विवाहयोग...

श्री
ह्या आजकालच्या उपवर मुला मुलींचे कसे असते माहित्येय?
Secured since childhood, लाडा कोडात वाढलेली असतात, शक्यतो एकुलती एक, त्यामुळे तो आणि ती साधारण सगळ लहानपणापासून हातात मिळालेलं आणि भरपूर सुबत्ता आणि पाठबळ असणारी असतात, .
love marriage असो किंवा arranged..प्रत्येकाला आपली स्पेस हवी, थोडा वेळ द्यायला हवा असतो नात्याला, जो ६ महिने अथवा कितीही मोठा असू शकतो. आणि मग पटकन निर्णय होतो की आपण एकमेकांच्या types चे नाही किंवा आहोत.. किंवा आता नातं नको नुसते मित्र राहू वगैरे. त्यांना challenges वेगळे असतील, आहेत पण तो विषय इथे नाही. ही पिढी लग्न ह्या विषयावर गोंधळलेली आहे हे निश्चित. 
हे वर व्यक्त केलेले विचार आपल्या डोक्या पलीकडे आहेत बर का..!
मित्रहो, आम्ही मित्र मंडळ जे सत्तर साली किंवा आसपास जन्मलो ना ( म्हणजे आत्ता वय ५३ वगैरे असणारे माझ्यासारखे), ते नेहमी म्हणतो..की आपली पिढी ही मागच्या पिढीच्या आज्ञेत होती , त्यांची मूल्ये जपणारी आणि नवीन पिढीचे विचार ऐकून घेणारी, म्हणजे राज कपूर च्या कल, आज ऑर कल मधल्या राज कपूरवाली ...मग तिथे आई ही मैत्रीण असते बाबा हा dad किंवा चांगला dude वगैरे असतो.
जर तरची गोष्ट , हे नाटक माझ्या पन्नास ते साठ आणि पुढेही अशा पिढीला पालक म्हणून बघणे अनिवार्य आणि अत्यावश्यक आहे.
आणि वर म्हटलेल्या ' गोंधळेकर ' पिढीला तर अगदीच mandatory.
उमेश कामत, प्रिय बापट ह्यांच्या साखरपुडा समारंभ नाटकाची सुरुवात करून देतो, आणि सोबतीला पल्लवी अजय आणि आशुतोष गोखले, पूर्ण दोन अंकात प्रचंड धमाल उडवून देतात..आणि हसता हसता अंतर्मुख पण करतात.
सर्वांची कामे एकदम जबरदस्त...
नेहमीप्रमाणे मी तुम्हाला काहीही पुढचे न सांगता, घरचा अभ्यास म्हणून नाटक बघाच असे सांगणार आहे.
नवरा बायको हे एकमेकांचे अत्यंत चांगले फ्रेंड्स , जीवनसाथी असले पाहिजेत आणि आयुष्यभरासाठी , ही अगदी 50 overs ची किंवा टेस्ट मॅच सारखी long term आणि ट्रस्ट बेस्ड partnership असते,
मला वाटतं आजकालच्या 20/20 खेळणाऱ्या पिढीला हे सांगितलं पाहिजे , नाही का?

© संजय सुभाष वेलणकर

Comments

Popular posts from this blog

धुरंधर 2 The Revenge

क्रांतिज्योती विद्यालय

The list